आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:कोरोनामुक्त रुग्ण 95 हजारांमध्ये विकताहेत प्लाझ्मा, रुग्णांच्या मदतीऐवजी व्यवसायाला प्राधान्य

इस्लामाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तानात मेमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता, जो अयशस्वी ठरला

पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपयोगी असणाऱ्या रक्तातील प्लाझ्माद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जात आहेत. येथे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचाा एक बाटली रक्तातील प्लाझ्मा ५७ हजार रुपयांपासून ते ९५ हजारांपर्यंत विकला जात आहे. स्थानिक डायग्नोस्टिक कंपन्यानुसार, एवढ्या महाग प्लाझ्मामुळे संशोधनातही अडथळा निर्माण होत आहे. मात्र, लोकांना नाइलाजाने जास्त पैसे मोजून प्लाझ्मा विकत घ्यावा लागत आहे.

इस्लामाबादमधील मोहम्मद साजिद म्हणाले, त्यांनी आपल्या कोरोनाबाधित मुलासाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा जास्त पैसे देऊन विकत घेतला. तर, माणुसकी मेलेली असून लोक पैसे उकळवण्यासाठी प्लाझ्मा विकत असल्याचे पाकिस्तानी नागरिक सारा भुट्टा ट्विट करत म्हणाल्या. पाकिस्तानी हवाई दलातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोबिया अली यांनी सांगितले, बरे झालेले रुग्ण व ब्लड बँकाँनी प्लाझ्माचे दान सुनिश्चित करावे. या संदर्भातील अनियमिततेची चौकशी करावी. आपण कोरोना युद्धाचा सामना करत आहोत. या आजारतून बरे झालेले लोक भाग्यवान आहेत. मात्र, लाहोर येथील व्यापारी शोएब अहमद सांगतात, अशाप्रकारे प्लाझ्माची किंमत वसूल करणे चुकीचे नाही. पाकिस्तानात लोकांनी कोरोनाकडे सुरुवातीपासूनच गांभीर्याने बघितले नाही. आता स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सरकारनेही लॉकडाऊनद्वारे प्रसार रोखण्यासाठी विशेष काही केले नाही.

पाकिस्तानात मेमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. जो अयशस्वी ठरला. भारताप्रमाणेच लॉकडाऊन लागू करण्याचा सल्ला तज्ञांनी पंतप्रधान इम्रान खान यांना दिला होता. डब्ल्यूएचओनेही पूर्णपणे लॉकडाऊनचा सल्ला दिला होता. मात्र, इम्रान यांनी ऐकले नाही. ९० टक्के कोरोना रुग्णांना साधारण ताप असल्याचे इम्रान यांनी म्हटले होते. यावर इस्लामाबादमध्ये इकर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील सहायक प्राध्यापक इश्फाक अहमद यांनी पंतप्रधान इम्रान भ्रमात असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे पंतप्रधानांचे आरोग्य विषयक सल्लागार डॉ. जफर मिर्झा यांनी सरकारला अर्थव्यवस्था व आरोग्य यात समतोल राखत निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, धर्मगुरूंच्या दबावाखाली कोरोनाकडे लक्ष न दिल्याचे अनेक तज्ञांनी म्हटले आहे. हा ईश्वराचा क्रोध असल्याचे इस्लामी धर्मगुरू मौलाना तारिक जमील यांनी यापूर्वीच दावा केला होता. एका स्थानिक सर्वेक्षणानुसार, केवळ ३ टक्के पाकिस्तानी कोरोना अस्तित्वात असल्याचे मानतात. इतर जण हे मुस्लिमांविरोधातील षडयंत्र असल्याचे म्हणतात.

आरोग्य सेवा : पाकिस्तानच्या रुग्णालयात प्रती १० हजार लोकांसाठी केवळ ६ बेड आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना १५ हजारांपासून २५ हजार, तर सरकारी रुग्णालयात ७० हजार ते ७८ हजार रुपये पगार दिला जात आहे.

अफगाण लष्कराच्या कारवाईत तेरा दहशतवादी ठार
काबूल | अफगाणिस्तानातील कंधार, हेलमंड राज्यात सैन्यांच्या कारवाईत १३ तालिबानी दहशतवादी ठार झाले. संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयानुसार, कंधार राज्यातील मेवाड जिल्ह्यात सोमवारी रात्री सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत नऊ दहशतवादी ठार झाले होते. तर, हेलमंड राज्यातील मारजा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या कारवाईत चार दहशतवादी मारले गेले. तसेच, दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके व इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...