आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खुर्ची वाचवण्याचे सर्व प्रयत्न अखेर फसले. नॅशनल असेंब्लीत रात्री १२.३२ वाजता अविश्वास प्रस्तावावर मतदान झाले आणि १२.५८ वाजता इम्रान सरकार १७४-० मतांनी पडले. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार रविवारी दुपारी संसदेची बैठक होत असून यात शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड होईल.
तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नॅशनल असेंब्लीचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याची मागणी केली. तर, सत्ताधारी पक्षाचे सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यानंतर इम्रान यांनी हे सरकार पाडण्यामागे कट असल्याचे सांगत अमेरिकी वकिलातीचे एक पत्र सभापतींकडे सोपवले. मात्र, रात्री ११ वाजता सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टात दाखल होताच इकडे सभापती असद कैसर आणि उपसभापती कासिम सुरी यांनी राजीनामे दिले.
रात्री 12:10 वा.- नॅशनल असेंब्लीचे स्पीकर असद कैसर आणि डेप्युटी स्पीकर कासिम सुरींनी राजीनामा दिला.
12:12 वा.- पीएमएलएनचे अयाज सादिक यांच्याकडे स्पीकरची जबाबदारी दिली. असेंब्लीचे कामकाज सुरू.
12:14 वा.- इम्रान समर्थक खासदार असेंब्लीतून बाहेर पडले.
12:15 वा.- इम्रानविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरू झाले.
12:30 वा.- मतदान सुरू. पाकच्या वेळेनुसार तारीख बदलल्यामुळे दोन मिनिटांसाठी प्रक्रिया रोखण्यात आली.
12:32 वा.- कामकाज सुरू. नॅशनल असेंब्लीच्या बाहेर इम्रान समर्थक जमले. लष्कर रस्त्यांवर उतरले. सभागृहाबाहेर कैद्यांना घेऊन जाणारी वाहने आणली. सर्व विमानतळांवर हाय अलर्ट. देशातील कुठलाही नेता वा अधिकारी एनओसीशिवाय देश सोडू शकणार नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.