आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pak MP Threatens To Kill Government Ministers In Suicide Attack If Anything Happens To Imran, Latest News And Update

व्हायरल VIDEO:पाक खासदाराची धमकी -इम्रानला काही झाले तर सरकारच्या मंत्र्यांना आत्मघातकी हल्ल्यात ठार करेन

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकचे शाहबाज शरीफ सरकारने देशद्रोहाप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे इम्रान यांनी आपल्या पीटीआय पक्षाचे सरकार असणाऱ्या खैबर पख्तुंख्वामध्ये आश्रय घेतला आहेत. 25 मे रोजी केवळ एका दिवसासाठी ते इस्लामाबादला आले होते. त्यांच्या अटकेसाठी आतापासूनच देशात वातावरण तयार केले जात आहे.

या घटनाक्रमामुळे पीटीआयचे खासदार अताउल्लाह खान यांनी इम्रान यांना अटक केल्यास सरकारचे मंत्री व त्यांच्या मुलांची आत्मघातकी हल्ल्यात हत्या करण्याचा इशारा दिला आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

खासदार एवढे नाराज का?

इम्रान खान काही दिवसांच्या एका रॅलीत म्हणाले होते- 'लष्कराने योग्य निर्णय घेतले नाही तर पाकची अण्वस्त्रे अमेरिकेच्या हाती लागतील. आपला देश दिवाळखोर होणार आहे. सर्वाधिक नुकसान लष्कराचे होईल. तुम्ही माझी गोष्ट लिहून ठेवा. पाकची 3 भागांत फाळणी होणार आहे.'

खान यांच्या या विधानाचे पाकिस्तानभर पडसाद उमटले. पण, त्यांचा पक्ष व त्याच्या सोशल मीडिया विभागाने त्यांच्या विधानाची ठामपणे पाठराखण केली.

इम्रान यांना आपल्या अटकेची भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणे सुरू केले आहे. या अंतर्गत सोशल मीडियावर लष्कर व सरकारविरोधात टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

इम्रान खान सध्या पत्नी बुशरा बीबीसोबत पेशावरमध्ये वास्तव्यास आहेत.
इम्रान खान सध्या पत्नी बुशरा बीबीसोबत पेशावरमध्ये वास्तव्यास आहेत.

खासदाराचे प्रक्षोभक विधान

कराचीचे खासदार अताउल्लाह म्हणाले -'माझे नेते इम्रान खान यांच्या केसालाही धक्का लागला तर देश चालवणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. मी मंत्री व त्यांच्या मुलांवर आत्मघातकी हल्ला करणारा पहिला व्यक्ती असेल. मी तुम्हाला सोडणार नाही. आमचे हजारो कार्यकर्तेही तयार आहेत.'

अताउल्लाह 2018 पासून खासदार आहेत. ते एक ख्यातनाम वकीलही आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा सरकारविरोधात अशी विधाने केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...