आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pak Petrol Price Rice | Marathi News | Imran Khan | The Rise In Petrol Prices Ahead Of The Long March Has Created Difficulties For The Imran Government; Struggle To Avoid Cabinet Expansion

इम्रान खानवर लोकांचा संताप:लाँग मार्चआधीच पेट्रोल दरावरून इम्रान सरकारच्या अडचणींत वाढ; कॅबिनेट विस्तारातून बचावाची धडपड

इस्लामाबादहून भास्करसाठी नासीर अब्बास6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय चलनात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 68 रुपये

अविश्वास प्रस्ताव आणि बेनझीर यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या लाँग मार्चच्या आधीच इम्रान खान यांच्या सरकारला इंधन दरावरून विरोधकांनी घेरले आहे. २७ फेब्रुवारीला हा मार्च काढण्यात येणार आहे. पेट्रोल-डिझेल, केरोसीनच्या दरात वाढ झाल्याने जनतेत प्रचंड संताप आहे. आतापर्यंत विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाचा मुकाबल्यासाठी सरकार राजकीयदृष्ट्या तयारीत होते, परंतु आता पेट्रोलियम पदार्थांच्या महागाईमुळे इम्रान सरकारला जनतेच्या रोषाला तोंड द्यावे लागत आहे. सत्ताधारी तेहरिक-ए-इन्साफ पार्टीच्या मते युक्रेन समस्येमुळे आंतरराष्ट्रीय दरांत वाढ झाली.

त्यातून ही दरवाढ करावी लागली. परंतु जनतेला ही दरवाढ मान्य नाही. इस्लामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ सदस्य अमजद हुसेन म्हणाले, पाकिस्तानात महागाई आणखी वाढेल. पीपीपीचा लाँग मार्च कराची ते इस्लामाबाद असेल. बिलावल भुत्तो त्याचे नेतृत्व करतील. पाकिस्तानात बुधवारपासून नवे दर लागू झाल्यानंतर पेट्रोलचे दर भारतीय चलनानुसार प्रतिलिटर ८६ रुपये झाले आहे.

सूत्रानुसार इम्रान सरकार अविश्वास प्रस्तावाला परतावून लावण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचा घाट घालत आहे. इम्रान सरकारला पाठिंबा देणारे मक्युएम व बलुचिस्तान आवामी पार्टीला प्रतिनिधित्व देण्याची तयारी करण्यात आली आहे. पाकिस्तानात इम्रान सरकारला या दोन पक्षांच्या समर्थनामुळे संसदेत बहुमत मिळालेले आहे.

सरकारवर अंतिम टप्प्यात, अविश्वास आणू : मरियम
पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या मरियम नवाज यांनी गुरुवारी महागाईवरून सरकारवर टीका केली. इम्रान सरकार अंतिम टप्प्यात आले आहे. आमचा पक्ष अविश्वास प्रस्ताव जरूर मांडेल. अविश्वास प्रस्तावासाठी सर्व विरोधी पक्षांना एकजूट दाखवावी लागेल. कारण हा पाकिस्तानच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे, असे मरियम यांनी सांगितले.

पेट्रो बॉम्ब सरकारसाठी घातक ठरणार : तज्ज्ञ
वरिष्ठ राजकीय विश्लेषक राणा तारिक दैनिक भास्करला म्हणाले, पेट्रोल बॉम्ब सरकारसाठी घातक ठरणार आहे. देशाची अर्थव्यवस्था आधीपासून डळमळीत झाली आहे. विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणि लाँग मार्च जाहीर केला आहे. विरोधी पक्षाला महागाईला मुद्दा बनवण्यात यश आल्यास हे इम्रान सरकारसाठी अडचणीचे ठरू शकते.

लोकांचा भुकेने मृत्यू होतोय, इम्रान सरकारने घरी जावे

पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीनंतर पाकिस्तानात झालेल्या पाहणीत ८५ टक्के लोकांनी इम्रान सरकारला शासन चालवणे आणि सामान्य जनतेला दिलासा देण्यात अपयश आल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांनी घरी जावे. सरकारी कर्मचारी मोहंमद अली म्हणाले, लोकांचा भुकेमुळे मृत्यू होत आहे. हाताला काम नाही. इम्रान सरकारला महागाई रोखता आलेली नाही. २७ वर्षीय शामी म्हणाले, पूर्वी दुचाकीवर कार्यालयात जात होतो. परंतु आता पायी जावे लागत आहे. कुटुंबाचे पोट भरणे जास्त गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...