आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:पाकिस्तानात पहिल्यांदाच राइट-लेफ्टची हातमिळवणी, 11 पक्षांचा इमरान सरकार विरोधात जाहीर सभांचा धडाका

इस्लामाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाझ यांची मुलगी मरियमने रॅलीत जनतेशी संवाद साधला - Divya Marathi
नवाझ यांची मुलगी मरियमने रॅलीत जनतेशी संवाद साधला
  • पाकिस्तानात पहिल्यांदाच राइट-लेफ्टची हातमिळवणी

पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून देशात पहिल्यांदाच सरकार, सैन्याविरोधात डाव्या-उजव्या विचारांच्या ११ राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. गेल्या महिन्यात या पक्षांनी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटची (पीडीएम) स्थापना केली. त्यात माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कट्टरवादी पीएमएल-एन व बिलावल भुत्तो-झरदारी यांचा डावा पक्ष पीपीपीदेखील सहभागी आहे.

या आघाडीचे नेतृत्व उजव्या विचारसरणीच्या जमियत उलेमा-ए-इस्लामचे प्रमुख फजलूर रहमान यांच्याकडे आहे. हे पक्ष सरकारने राजीनामा द्यावा या मागणीवर ठाम आहेत. देशाच्या राजकीय तसेच सरकारी प्रकरणांत लष्कराचा हस्तक्षेप कधीही सहन केला जाऊ शकत नाही, असे या पक्षांनी निक्षून सांगितले. सरकारविरोधात आघाडीने तीन टप्प्यांत आंदोलनाची योजना तयार केली आहे. याअंतर्गत गुजरांवाला येथे पहिली सभा झाली. दरम्यान, पंजाबमध्ये विरोधी ४५० नेते तसेच कार्यकर्त्यांची धरपकड झाली. इम्रान यांच्या तेहरिक-ए-इन्साफची पंजाबमध्ये सत्ता आहे. अटकेतील पीएमएल-एनच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईनंतर पक्षाच्या प्रवक्त्या मरियम म्हणाल्या, इम्रान वेडे झाले आहेत. त्यांनी सभा फ्लॉप करण्यासाठी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वास्तविक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. पेट्रोलियम पदार्थही महागले आहेत. देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेमुळे जनता इम्रान यांच्यावर नाराज असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे या रॅलीमुळे सरकारला काहीही धोका नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

सरकारविरोधात सभा : १८ ऑक्टोबर -कराची, २५ ऑक्टोबर-क्वेट्टा, २२ नोव्हेंबर- पेशावर, ३० नोव्हेंबर- मुलतान, १३ डिसेंबर- लाहोर येथे जाहीर सभा घेतल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...