आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकला धमकीचे उत्तर:तालिबानी मंत्र्याने दाखवला 1971 मध्ये पाकिस्तच्या आत्मसमर्पणाचा फोटो, म्हणाले- परिणाम लक्षात ठेवा

25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
अफगाण तालिबानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी 1971 मध्ये भारताकडून पाकिस्तानी सैन्याचा पराभव आणि आत्मसमर्पणाचे छायाचित्र शेअर केले आहे. - Divya Marathi
अफगाण तालिबानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी 1971 मध्ये भारताकडून पाकिस्तानी सैन्याचा पराभव आणि आत्मसमर्पणाचे छायाचित्र शेअर केले आहे.

पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी गुरुवारी अफगाण तालिबानला धमकी दिली. ते म्हणाले की, जर त्यांनी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ला आमच्या देशात हल्ले करण्यापासून रोखले नाही तर आम्ही अफगाणिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करू.

याचे उत्तर अफगाण तालिबानचे उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी अतिशय कडक शब्दात दिले. यासिर यांनी 1971 मध्ये भारताच्या हातून पाकिस्तानी सैन्याच्या पराभवाचे आणि आत्मसमर्पणाचे छायाचित्र शेअर केले आणि म्हटले- या प्रकारचा परिणाम लक्षात ठेवा.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार यांच्यातील संबंध आतापर्यंतच्या खराब पातळीवर पोहोचले आहे. सुमारे दोन महिन्यांपासून दोन्ही देशांच्या सीमेवर म्हणजेच ड्युरंड लाइनवर गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये पाकिस्तानचे 12 सैनिक आणि 7 नागरिक ठार झाले आहेत. टीटीपीही पाकिस्तानमध्ये सातत्याने हल्ले करत आहे. अलीकडेच इस्लामाबादमध्ये फिदाईन हल्लाही झाला होता.

अलीकडील भांडणाचे कारण

टीटीपी पाकिस्तानमध्ये सातत्याने हल्ले करत आहे. त्यामुळे तेथील लष्कर आणि सरकार धास्तावले आहे. गुरुवारी, पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी टीटीपी हल्ल्यांसाठी अफगाण तालिबानला जबाबदार धरले. ते म्हणाले की, ‘टीटीपीचे दहशतवादी पाकिस्तानात हल्ले करून अफगाणिस्तानात आश्रय घेतात. हे हल्ले थांबले नाहीत तर आम्ही अफगाणिस्तानात घुसून या दहशतवाद्यांना ठार करू. आम्हाला माहित आहे की, अफगाणिस्तानच्या कोणत्या भागात आणि टीटीपीचे दहशतवादी कुठे आश्रय घेतात. तेथून त्यांना शस्त्रेही मिळतात.’

या धमकिला प्रत्युत्तर

 • पाकिस्तानच्या या धमकीमुळे तालिबानी सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तालिबानचे वरिष्ठ नेते आणि उपपंतप्रधान अहमद यासिर यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यासोबत उर्दूमध्ये एक कॅप्शन शेअर केले आहे. प्रथम या फोटोबद्दल जाणून घ्या. हा फोटो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा आहे. पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव झाला. त्यांच्या 90 हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती.
 • आत्मसमर्पण दस्तऐवजावर पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल आमिर अब्दुल्ला खान नियाझी यांनी स्वाक्षरी केली होती. आपल्या लष्कराचे लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा त्यांच्या शेजारीच उपस्थित होते. या आत्मसमर्पणानंतर बांगलादेश वेगळा देश झाला आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.
 • आता या फोटोसोबत तालिबान नेते यासिर यांनी लिहिलेल्या कॅप्शनबद्दल बोलूया. त्यात म्हटले आहे की, ‘राणा सनाउल्लाह, जबरदस्त. हे अफगाणिस्तान आहे हे विसरू नका. हा तो अफगाणिस्तान आहे जिथे महान शक्तींच्या कबरी बांधल्या गेल्या आहेत. आमच्यावर लष्करी हल्ल्याची स्वप्ने पाहू नका, अन्यथा परिणाम भारतासमोर तुमचा झाला तितकाच लाजिरवाणा असेल.

संरक्षण मंत्रालयाचीही कडक भूमिका

या विधानानंतर काही तासांनी अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयानेही स्वतंत्र निवेदन जारी केले. ते म्हणाले की, पाकिस्तान बिनबुडाचे आरोप करत आहे. आमच्याकडे टीटीपीला कोणताही आश्रय नाही. अफगाणिस्तान कमकुवत आहे किंवा त्याला कोणीही स्वामी नाही अशा भ्रमात राहू नये. आपल्या देशाचे रक्षण कसे करायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. हल्ला झाला तर चोख प्रत्युत्तर देऊ.

गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले करण्यात आले.
गेल्या महिन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले करण्यात आले.

तालिबानचे दोन गट आणि वाद

 • 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाण तालिबानने काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तालिबानचे दोन गट आहेत. पहिला- अफगाणिस्तान तालिबान. यात ताजिक, उझबेक, पश्तून आणि हजारा यासह अनेक समुदायांचे लोक आहेत. दुसरा- TTP म्हणजे तालिबान पाकिस्तान. त्यात प्रामुख्याने पश्तून आणि पठाणांचा समावेश आहे. ते पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि वझिरीस्तानमध्ये सक्रिय आहेत.
 • अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी तालिबान यांचा उद्देश किंवा विचारसरणी एकच आहे. दोघांनाही कट्टर इस्लाम आणि शरिया कायदा लागू करायचा आहे. टीटीपीचे म्हणणे आहे की पाकिस्तान हा अर्धा अपूर्ण इस्लामिक देश आहे आणि येथे शरिया कायदा पूर्णपणे लागू झाला पाहिजे.
 • TTP त्यांच्या अटी लागू करण्यासाठी खैबर पख्तुनख्वा, वझिरीस्तान आणि देशाच्या इतर भागात हल्ले करतात. अलीकडेच राजधानी इस्लामाबादमध्ये फिदाईन हल्ला झाला होता. यामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
 • पाकिस्तानी लष्कर आणि सरकारची सर्वात मोठी अडचण म्हणजे आता बलुचिस्तानच्या बंडखोरांनीही टीटीपीशी हातमिळवणी केली आहे. एकूणच पाकिस्तानसाठी हे अत्यंत धोकादायक संकेत आहेत. दुसरीकडे, अफगाण तालिबान टीटीपीला पूर्ण पाठिंबा देत आहेत. अफगाण तालिबानला पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा म्हणजे ड्युरंड लाइनही मान्य नाही. या वादामुळे यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता. यामध्ये पाकिस्तानचे अनेक सैनिक आणि सामान्य नागरिक मारले गेले.
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी गेल्या महिन्यात काबूलमध्ये गेल्या होत्या. मात्र, भेट अयशस्वी ठरली.
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी गेल्या महिन्यात काबूलमध्ये गेल्या होत्या. मात्र, भेट अयशस्वी ठरली.

सीमा वादाचे कारण?

 • पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेने विभक्त आहेत. यालाच ड्युरंड लाइन म्हणतात. पाकिस्तान याला सीमारेषा मानतो, पण तालिबान स्पष्टपणे सांगतात की, पाकिस्तानचे खैबर पख्तूनख्वा राज्य त्यांचा भाग आहे. पाकिस्तानी सैन्याने येथे काटेरी तारांचे कुंपण केले आहे.
 • 15 ऑगस्ट 2021 रोजी अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने ताब्यात घेतली. 5 दिवसांनंतर म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी त्यांनी स्पष्ट केले की, तालिबान ड्युरंड लाइन मान्य करत नसल्याने पाकिस्तानला अफगाणिस्तानचा भाग रिकामा करावा लागेल.
 • पाकिस्तानने याला विरोध करत तेथे लष्कर तैनात केले. यानंतर तालिबानने तेथे उपस्थित असलेल्या पाकिस्तानवर हल्ला केला. यानंतर तालिबानने तेथील पाकिस्तानी चेकपोस्ट उडवून लावले. या भागात अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून अनेक तालिबानच्या ताब्यात आहेत. गेल्या आठवड्यातच तालिबानच्या गोळीबारात 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले.
 • पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या अखेरीस काबूलला भेट दिली होती. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला ड्युरंड रेषेवरील कुंपण तोडणे थांबवणे आणि टीटीपीला पाकिस्तानात हल्ले करण्यापासून रोखणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश होता. मात्र, हिना या पाकिस्तानात परतल्यानंतर 24 तासांतच काबूलमधील पाकिस्तानी दूतावासावर हल्ला झाला आणि सीमेवर जोरदार गोळीबार सुरू झाला.
बातम्या आणखी आहेत...