आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pakistan Airlines | Pakistan International Airlines (PIA) Suspended By European Union Agency (EASA) Because Of Pilot's Fake Licenses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी वैमानिकांवर बंदी:बनावट लायसेन्स प्रकरणी युरोपात पाकिस्तानातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांवर बंदी

ब्रसेल्सएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • युरोपियन युनियन एअर सेफ्टी एजन्सीने मंगळवारी रात्री प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली
  • 262 वैमानिकांचे परवाने बनावट असल्याचे पाकिस्तानच्या विमान वाहतूक मंत्र्यांनी सांगितले होते

860 पैकी 266 व्यावसायिक वैमानिकांचा परवाना बनावट असल्याचा खुलासा पाकिस्तानला महागात पडला. युरोपच्या एअर सेफ्टी एजन्सी ईएएसएने पाकिस्तानची सरकारी एअरलाइन्स कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) वर 6 महिन्यांची बंदी घातली आहे. या दरम्यान, कोणत्याही युरोपियन देशात पीआयएचे कोणतेही विमान उतरू किंवा उड्डाण करू शकणार नाही.

अलीकडेच पाकिस्तानचे हवाई वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत खुलासा केला की पीआयएचे 40% पायलट बनावट परवान्यांसह विमान चालवित आहेत. काही तासांनंतर यांच्या विमानालाही बंदी घालण्यात आली.

युरोपच्या सुरक्षा एजन्सीने काय म्हटले?

मंगळवारी रात्री प्रसिद्ध झालेल्या निवेदनात ईएएसएने म्हटले आहे- आम्ही पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपनीच्या युरोपमध्ये ये-जा करण्यावर 6 महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून याची अंमलबजावणी होईल. पीआयएने देखील याची पुष्टी केली आहे. तसेच या बंदीविरोधात ते अपील करू शकतात असेही ते म्हणाले. या बंदीचा अर्थ असा आहे की आता पाकिस्तानच्या लोकांना सरकारी विमानाने युरोपला जाणे किंवा तेथून परत येणे अशक्य होईल.

तिकिटांचे पैसे परत केले जातील

पीआयएने निवेदनात म्हटले आहे- ज्यांनी युरोपसाठी विमानाचे तिकीट काढले होते. ते सर्व आता रद्द समजले जातील. तिकिटाचे पैसे देखील परत केले जातील. आम्ही ईएएसएसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. विशेष म्हणजे ही परिस्थिती का आली हे पीआयएने निवेदनात सांगितले नाही. 

पाच देशांनी यापूर्वीच घातली आहे बंदी

कुवैत, इराण, जॉर्डन, यूएई आणि व्हिएतनाम या पाच देशांनी याआधीच पाकिस्तानातून येणाऱ्या आणि तिकडे जाणाऱ्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. चार देशांनी कोविड-19 च्या धोक्याचे कारण सांगितले. तर व्हिएतनामने तेथील पायलटांना तेथून बाहेर काढण्याची घोषणा करून थांबवले होते.

वैमानिकांच्या चुकीमुळे झाला होता कराची विमान अपघात 

22 मे रोजी कराचीत पीआयएचे एक विमान कोसळले होते. 25 जून रोजी याचा तपासणी अहवाल संसदेत सादर करण्यात आला. विमान वाहतूक मंत्री म्हणाले - वैमानिकांच्या चुकीमुळे अपघात झाला. ते कोरोनावर चर्चा करण्यात व्यस्त होते. पीआयएमध्ये 860 पायलट आहेत. त्यातील 262 जणांकडे बनावट परवाना असल्याचा संशय आहे. त्यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळखोरीच्या काठावर उभे असलेल्या पीआयएच्या अडचणींत वाढ होत चालली आहे. 

बातम्या आणखी आहेत...