आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाई आणि आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या पाकिस्तानला आता वीज संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी संपूर्ण पाकिस्तानात वीजपुरवठा खंडीत झाला. इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या शहरांमध्ये अनेक तासांपासून वीज नाही.
ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, नॅशनल ग्रीड सकाळी 7:34 वाजता डाऊन झाल्याने वीज यंत्रणा बिघडली. मंत्रालयाने सांगितले की, यंत्रणेतील बिघाड सुधारण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.
दुरूस्तीसाठी लागतील 8 ते 10 तास
उर्जा मंत्री खुर्रम दस्तागीर यांनी जिओ न्यूजला सांगितले की, वीज बचतीसाठी हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती युनिट्स बंद ठेवले जातात. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू केली. तेव्हा उत्तर पाकिस्तानातील क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये दबाव आला. त्यामुळे एकामागून एक अशी यंत्रणेत बिघाड होत गेली. माध्यमांतून सांगण्यात येत आहे की, वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी 8 ते 10 तास लागू शकतात. त्यामुळे लोकांना वीजेविना काही तास राहावे लागणार आहे.
बलुचिस्तानमध्ये 22 जिल्हे वीज विना
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, क्वेटा वीज पुरवठा कंपनीने सांगितले की, बलुचिस्तानमधील 22 शहरात सकाळपासून वीजगुल झालेली आहे. गुड्डू ते क्वेटा दरम्यानच्या पुरवठा लाईनमध्ये समस्या निर्माण झाली होती.
गतवर्षी 12 तास वीजपुरवठा खंडित झाला होता
पाकिस्तानने यावर्षी नवीन ऊर्जा योजना आणली आहे. गेल्यावर्षी देखील ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये सुमारे 12 तास वीजपुरवठा झाला नव्हता.
हे ही वाचा...
आर्थिक संकटामुळे शेजारी राष्ट्रांची डोकेदुखी वाढली : पाकिस्तानमध्ये वीज संकट गंभीर, विक्रमी महागाईचा भडका
पाकिस्तानात गंभीर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. वास्तविक आधीपासून आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या जनतेसमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. अलीकडेच मंत्रिमंडळाची बैठकदेखील अंधारात झाली - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.