आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मानवतेविरूद्ध षडयंत्र:चीन आणि पाकिस्तानने भारताविरूद्ध जैविक युद्धाचा कट रचला, तीन वर्षांपासून गुप्त करार केला; रिपोर्ट

बीजिंग/वॉशिंग्टन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन आणि पाकिस्तान हे भारतासह इतर पाश्चात्य देशांविरूद्ध देखील कट रचत आहेत, रिपोर्टमध्ये दावा

चीन आणि पाकिस्तान एकत्रितपणे भारत आणि पाश्चात्य देशांविरुद्ध जैविक युद्धाचा कट रचत आहेत. यासाठी दोन्ही देशांनी तीन वर्षांचा गुप्त करार केला आहे. एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. त्यात असे म्हटले आहे की षडयंत्रांतर्गत अँथ्रॅक्ससारख्या धोकादायक विषाणूवर काम केले जाईल. याबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली आहे. या रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यांमध्ये दम दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला होता की कोरोनाव्हायरसची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅबमधून झाली आहे. आणि अमेरिकेकडे याचे पुरावे आहे.

कोणी केला दावा?

हा अहवाल क्लाझॉन नावाच्या युनिटने गुप्तचर स्रोतांच्या हवाला देत केला आहे. सुरक्षा तज्ज्ञ अँथनी क्लान यांनी यावर लेख लिहिला. वृत्तसंस्थेने तो प्रकाशित केला.

रिपोर्टमध्ये काय आहे?

या रिपोर्टनुसार, वुहानच्या ज्या लॅबमधून कोरोना व्हायरस निघण्याचा दावा अमेरिका करत आहे, त्याच लॅबने पाकिस्तानबरोबर जैविक युद्धाची तयारी सुरू करण्याचा कट रचला आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिकेसारखे पाश्चिमात्य देश निशाण्यावर आहेत. या देशांना संसर्गजन्य रोगांचे लक्ष्य केले जाईल. रिसर्चवर होणारा खर्च चीनच्या वुहानमधील लॅब उचलणार आहे. 

जैविक शस्त्रांचा कट

एका गुप्तचर स्रोताच्या हवाल्यानुसार रिपोर्टमध्ये म्हटले की, अँथ्रॅक्ससारखा व्हायरस शस्त्र म्हणून वापरण्याचा धोका आहे. यावर पाकिस्तान आणि चीनने तीन वर्षांचा गुप्त करार केला आहे. या करारानुसार जैविक हत्यारे तयार केली जातील. यासाठी आवश्यक मातीशी संबंधित चाचण्या देखील केल्या आहेत. चीनने पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना याबाबत डेटा व इतर महत्वाची माहिती पुरविली आहे.

पाकिस्तानच्या खांद्यावर चीनची बंदूक

गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानचा वापर करत भारताविरुद्ध कट रचला आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळाली आहे. चीनला हे षड्यंत्र स्वतःहून घडवायचे नाही. म्हणूनच त्याने याच्याशी संबंधित चाचण्या पाकिस्तानमध्ये करण्याचे नियोजन केले. धोकादायक म्हणजे पाकिस्तानच्या लॅबमध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.