आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:बलुचिस्तानमध्ये पुन्हा भीषण स्फोट, 4 जणांचा मृत्यू, तर 10 जखमी​​​​​​​

इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या बलुचीस्तानमधील सिबी जिल्ह्यात पुन्हा एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार जवान शहीद झाले असून 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) च्या अब्दुल रहमान अल बकिस्तानी असे हल्लेखोराचे नाव आहे. हा हल्ला करण्यासाठी त्याने इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव डिवाइस (आयईडी) वापरण्यात आल्याची माहिती आहे. तर हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सिबीच्या सहाय्यक आयुक्त सना मेहजबीन यांनी प्रसारमाध्यमांना दिली. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्या 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

आठवडाभरापूर्वी सिबीमध्ये झाला होता स्फोट

आठवडाभरापूर्वीच बलुचिस्तानमधील सिबी जिल्ह्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. वार्षिक जत्रेदरम्यान झालेल्या या स्फोटात 5 जवान शहीद तर 28 जण जखमी झाले होते. तसचे याच महिन्यात पेशावरमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एक स्फोट घडवून आणला होता. यात फिदाईन हल्ल्यात पार्थना करण्यासाठी आलेल्या 56 नमाजकांचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानमध्ये अराजकता

गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये हळूहळू अराजकता वाढत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर संकट निर्माण झाले आहे, असे पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीजने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं.

काय आहे इस्लामिक स्टेट खोरासान ?

ईशान्य इराण, दक्षिण तुर्कमेनिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या प्रदेशावरून इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) हे नाव देण्यात आले आहे. ही संघटना 2014 मध्ये पूर्व अफगाणिस्तानात प्रथम सक्रिय झाली होती. सर्वाधिक धोकादायक आणि हिंसक अशी ही संघटना आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या मते, या संघटनेमध्ये सीरियातील काही दहशतवादी आणि इतर विदेशी अतिरेक्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...