आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानी माध्यमांच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवांचे कुटुंब 6 वर्षांतच अब्जाधीश झाले आहे. बाजवांच्या निवृत्तीच्या 8 दिवस आधीच पाकिस्तानी पत्रकार अहमद नुरानींनी रविवारी 'फॅक्ट फोकस'साठी लिहिलेल्या रिपोर्टमध्ये हा दावा केला आहे. बाजवांचा कार्यकाळ 29 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.
नुरानींनी म्हटले आहे - गेल्या 6 वर्षांत बाजवांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी कराची, लाहोरसह पाकिस्तानच्या मोठ्या शहरांत फार्म हाऊस बनवले, इंटरनॅशनल बिझनेस आणि कमर्शियल प्लाझा सुरु केले. याशिवाय त्यांनी परदेशात प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत 12.7 अब्जांपेक्षाही जास्त आहे. ही डील बाजवांची पत्नी आयेशा अमजद, सून महनूर साबिर आणि कुटुंबातील काही निकटवर्तीयांच्या नावे झाली आहे.
बाजवांच्या पत्नीचे उत्पन्न शून्यावरून दोन अब्ज झाले
आयेशा अमजदच्या नावावर 2016 मध्ये आठ नव्या प्रॉपर्टी खरेदी करण्यात आल्या. ज्यांची एप्रिल 2018 मधील फायनान्शिएल स्टेटमेन्टमध्ये नोंद करण्यात आली. तेव्हा बाजवा सैन्यप्रमुख होते. रिपोर्टमध्ये म्हटले आहे - 2015 मध्ये आयेशांच्या नावावर एकही प्रॉपर्टी नव्हती. पण 2016 मध्ये एकूण प्रॉपर्टीसह त्यांचे उत्पन्न शून्यावरून 2.2 अब्जांवर गेले.
अशाच प्रकारे बाजवांची सून महनूर साबिरच्या नावावरही अनेक प्रॉपर्टींची खरेदी झाली. 2018 मध्ये लग्नाच्या एका आठवड्याच्या आतच त्यांचे उत्पन्न शून्यावरून सुमारे एक अब्ज झाले.
बाजवांचे स्पष्टीकरण - 2013 च्या आधी खरेदी केली प्रॉपर्टी
टॅक्स रिटर्न आणि फायनान्शिएल स्टेटमेन्टचा हवाला देत नुरानींनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे - 2013 ते 2017 पर्यंत सैन्य प्रमुख असताना बाजवांच्या उत्पन्नाच्या स्टेटमेन्टमध्ये तीन वेळा बदल झाले. बाजवांनुसार, त्यांनी लाहोरमध्ये एक संपत्ती 2013 मध्ये विकत घेतली होती, पण ती स्टेटमेन्टमध्ये घोषित करण्यास ते विसरले होते. पुढच्या चार वर्षांपर्यंत त्यांनी या संपत्तीची माहिती दिली नाही. नंतर 2017 मध्ये पुन्हा सैन्यप्रमुख झाल्यावर त्यांनी आपल्या फायनान्शिएल स्टेटमेन्टमध्ये सुधारणा केली आणि ही संपत्ती घोषित केली.
पाकिस्तानात सैन्य प्रमुख सर्वात शक्तिशाली
पाकिस्तानात सैन्य प्रमुख सर्वात शक्तिशाली व्यक्ती असतो. सरकार सैन्याच्या इशाऱ्यावरच काम करते. अशात प्रत्येक पंतप्रधानाला वाटते की त्याच्या विश्वासातील व्यक्तीस सैन्य प्रमुख बनावा. सैन्य प्रमुखांची नियुक्ती पंतप्रधान करतात. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणू इच्छितात. सैन्य प्रमुखांच्या नियुक्तीत आपला सल्लाही घेतला जावा असे त्यांचे धोरण आहे. इम्रान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना प्रस्तावही दिला आहे की, त्यांना सैन्य प्रमुखांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत सहभागी केले जावे. शाहबाज यांनी याला नकार दिला. आता इम्रान यांचे म्हणणे आहे की, शाहबाज त्यांच्या आवडीचे सैन्य प्रमुख निवडू शकतात.
पाकिस्तानात सैन्य प्रमुखाच्या शर्यतीत 6 नावे
जनरल बाजवा 29 नोव्हेंबरला निवृत्त होतील. यानंतर नव्या प्रमुखांची नियुक्ती होईल. या शर्यतीत 6 जणांची नावे आहेत. ले.ज. असीम मुनीर, ले.ज. साहिर शमशाद मिर्झा, ले.ज. अजहर अब्बास, ले.ज. नौमान महमूद, ले.ज. फैज हमीद, ले.ज. मोहम्मद आमिर यांचा यात समावेश आहे. तर बाजवांनी नियुक्तीसाठी एक्स्टेन्शन घेण्यास नकार दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.