आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खानवर कायदेशीर कारवाई करा:पाक लष्कर म्हणाले - स्वतःच्या स्वार्थासाठी लष्करावर खोटे आरोप करत आहेत माजी PM

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी लष्कराने शुक्रवारी आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नाहक बदनाम केल्याप्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. इम्रान यांच्यावर गुरुवारी गुजरांवालां येथील एका रॅलीत गोळीबार झाला होता. या प्रकरणी त्यांनी 3 जणांचे नाव घेतले आहे. त्यात गृहमंत्री राणा सन्नाउल्ला, पंतप्रधान शाहबाज शरीफ व मेजर जनरल फैजल यांचा समावेश आहे.

मेजर जनरल फैजल यांचे नाव घेतल्याप्रकरणी लष्कर संतप्त झाले आहे. पाक लष्कराच्या आंतरसेवा जनसंपर्काचे महासंचालक लेफ्टनंट जनरल इफ्तिकार बाबर म्हणाले की, पाकिस्तानी लष्कर व उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांविरोधात पाकिस्तान तहरिक ए इंसाफचे प्रमुक इम्रान कान यांचे निराधार व बेजबाबदार आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे सरकारने इम्रान यांच्यावर कायदेशीर करावी अशी आमची मागणी आहे.

PTIची देशभर निदर्शने

इम्रान खान यांच्यावरील हल्ल्याविरोधात पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्ष शनिवारी देशभर निदर्शने करणार आहे. ही निदर्शने सायंकाळी 5 वा. सुरू होतील. पीटीआय नेते असद उमर यांनी ही घोषणा केली आहे.

दुसरीकडे, इस्लामाबाद पोलिसांनी लाँग मार्चमध्ये सहभागी होणाऱ्या 24 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यात पीटीआयच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. या लोकांवर पोलिसांवर हल्ला करणे व सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याचा आरोप आहे.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गुरुवारी इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढत होते. तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गुरुवारी इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढत होते. तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.

लष्कराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न

पाक लष्कराने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे की, लष्कर अत्यंत प्रोफेश्नल व शिस्तीत काम करणारी संस्था आहे. याचा आम्हाला गर्व आहे. कोणत्याही सैनिक किंवा अधिकाऱ्याने बेकायदेशीर कृत्य केले असेल तर त्याचे उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी आमच्याकडे अत्यंत मजबूत व्यवस्था आहे.

पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी खोटे आरोप करून लष्कर व तिच्या अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला तर लष्कर कोणत्याही स्थितीत आपल्या अधिकारी व सैनिकांची सुरक्षा करेल. हेच लक्षात घेऊन आम्ही पाक सरकारला या प्रकरणाचा तपास करून लष्करावर निराधार आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...