आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबाना यांनी दावा केला आहे की, पाकिस्तानच्या सैन्यामध्ये अल कायदा आणि दुसऱ्या दहशतवादी संघटनेचे अनेक मदत करणारे आहेत. ही गोष्ट आता कोणापासूनही लपलेली नाही. ओबामांनी आपल्या 'ए प्रॉमिस्ड लँड' पुस्तकात हे लिहिले आहे. ओबामांनी पुस्तकामध्ये स्पष्ट केले आहे की, जर 2011 मध्ये ओसामा बिन लादेलना मारण्यासाठी चालवण्यात आलेल्या ऑपरेशनची माहिती पाकिस्तानला दिली असती तर हे मिशन फेल गेले असल्याचे म्हटले आहे.
आयएसआय वर निशाणा
ओबामा यांच्या मते- पाकिस्तानी सैन्यात अल कायदा, तालिबान आणि इतर दहशतवादी संघटनांचे सहाय्यक आहेत हे उघड रहस्य आहे. हे सर्व किती धोकादायक ठरू शकते हे आपल्या सर्वांना माहित आहे. गुप्तचर संस्था (आयएसआय) चे अल कायदा आणि तालिबानशी थेट व घनिष्ट संबंध आहेत. आयएसआय या दहशतवादी संघटनांचा भारत आणि अफगाणिस्तानविरूद्ध वापर करत आहे.
लादेनला मारण्याच्या ऑपरेशनच्या विरोधात होते बायडेन
यूएस सील कमांडोजने ओसामा बिन लादेनला 2 मे 2011 रोजी पाकिस्तानच्या एबटाबाद शहरात ठार मारले होते. तेव्हा ओबामा यांनीच सकाळी टीव्हीवर या कारवाईबद्दल जगाला सांगितले होते. ओबामा यांनी एक धक्कादायक खुलासा केला. त्यांच्या मते, लादेनला मारण्यासाठी जेव्हा सीक्रेट ऑपरेशन प्लान करण्यात आला होता, तेव्हा याला तत्कालिन व्हाइस प्रेसिडेंट जो बायडेन आणि डिफेंस मिनिस्टर रॉबर्ट गेट्स सहमत नव्हते.
धोकादायक ऑपरेशन
ओबामा यांच्या म्हणण्यानुसार लादेनला ठार मारण्याची कारवाई करणे सोपे नव्हते. त्यात बरीच रिस्क होती. कारण, एबटाबादमध्ये पाकिस्तानी सैन्याचा तळ होता आणि लादेनचा तळ खूपच सुरक्षित होता. पण, आमच्याकडे मजबूत इंटेलिजेंस आणि योजना होती. मी माझ्या टीमला रेडची अंतिम योजना तयार करण्यास सांगितले.
पाकिस्तानवर विश्वास ठेवता आला नाही
ओबामा यांनी लिहिले - आमच्याकडे पर्याय होते, पण त्यातही धोका होता. मुत्सद्दी संबंधही धोक्यात आले होते. ही योजना लीक झाल्यास ती अपयशी ठरली असती. म्हणून, याबद्दल फारच कमी लोकांना माहिती देण्यात आली. आम्ही फक्त एकच विचार केला होता की कोणत्याही योजनेत पाकिस्तानला सामिल करु नये. तेथील गुप्तचर संस्था अफगाणिस्तान सरकार कमकुवत करते. भारताविरूद्ध षड्यंत्र रचतात.
ओबामा पुढे लिहितात - हवाई हल्ल्याद्वारे कंपाऊंड नष्ट करण्याचा पहिला पर्याय होता. दुसरा पर्याय होता - कमांडो टीमने तेथे प्रवेश करून लादेनला ठार मारावे. आम्ही दुसरा पर्याय निवडला आणि निर्णय घेतला की कमांडो ऑपरेशननंतर लवकरच आपल्या ठिकाणावर परत येतील. तेथे पाकिस्तानी पोलिस किंवा सैन्य पोहोचू शकत नाही याची दक्षता घेतली जाईल.
हिलरी यांनाही संशय आला
ओबामा म्हणतात- हिलरी क्लिंटन त्यावेळी परराष्ट्रमंत्री होत्या. त्या म्हणाल्या होत्या- या ऑपरेशनच्या यशाचे गुणोत्तर 51-49 आहे. तर बायडेन यांनाही वाटले होते की, हे मिशन अयशस्वी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. संरक्षण सचिवही हवाई हल्ल्याच्या बाजूने होते. ऑपरेशननंतर मी बर्याच परदेशी नेत्यांशी बोललो. मात्र, त्यावेळी पाकिस्तानचे राष्ट्रपती राहिलेले असिफ अली झरदारी यांच्याशी बातचित करणे कठीण होते. मात्र, त्यांनी माझे अभिनंदन केले आणि दहशतवाद्यांनी त्यांची पत्नी बेनझीर यांची कशी हत्या केली होती याची आठवण करून दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.