आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदा उघड:तहरिक-ए-तालिबानच्या अटींपुढे पाकिस्तान लष्कराने टाकली नांगी

लंडन | गुल बुखारी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी लष्कर आणि अतिरेकी संघटना तहरिक- ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) यांच्यातील समझोता उघडकीस आला आहे. अफगानिस्तानात तालिबानला साह्य केल्यानंतर तालिबान टीटीपीच्या मुसक्या आवळेल, असा विश्वास रावळपिंडीला (लष्कराचे मुख्यालय) होता. याऐवजी अफगानिस्तानात टीटीपीच्या हजारो सदस्यांना सोडून देण्यात आले. यंदा जानेवारी ते जूनदरम्यान टीटीपीने पाकिस्तानात ४३४ हल्ले केले.

इम्रान सरकारच्या पतनानंतर शाहबाज सरकारचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी मे अखेरीस गोपनीय चर्चेची माहिती मिळाल्यानंतर ती संसदेत सादर केली. संसदेत दोन सुनावण्यांनंतर यावर एखादी कारवाई होत असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. यादरम्यान खैबर पख्तुनवा प्रांतात ज्यात फाटा आणि मलकंद विभाग येतात, तेथे टीटीपीने ताबा मिळवला. एएनपी नेत्याचा दावा आहे, की येथे इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे माजी नॅशनल असेम्ब्ली अध्यक्ष असद कैसरसह अनेक नेते टीटीपीला संरक्षणासाठी खंडणी देत आहेत. ‘पाकिस्तान सरकार आणि टीटीपी यांच्यातील चर्चा’ अशा शीर्षकाचा सात पानांचा समझोता ९ मे २०२२ रोजी काबूलमध्ये झाला होता. त्यादरम्यान पाक संसदेत सांगितले गेले होते की, संसदेच्या मान्यतेविना कोणताही करार होणार नाही. गुप्तचर संस्था संसदेत माहिती देत असताना तालिबान कैद्यांची सुटका सुरू झाली होती. दोन वरिष्ठ कमांडर मुस्लिम खान (३१ नागरिक आणि जवानांच्या हत्येसाठी मृत्युदंडाची शिक्षा) आणि महमूद खान (चीनी अभियंत्यांच्या अपहरणासाठी २० वर्षांची शिक्षा) यांची गुप्तपणे सुटका करण्यात आली. जुलैच्या सुरुवातीला संसदेत दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली जात असताना एका सदस्याला माहिती मिळाली की, टीटीपीच्या दोन कमांडरना राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारानुसार सोडून देण्यात आले आहे. टीटीपीवरील प्रतिबंध हटवण्यासाठी लष्कर तयार झाले होते. टीटीपीला पाकिस्तानात सशस्त्र फिरण्याची मुभा दिली होती, मलकंदमध्ये शरिया कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावर विचार सुरू होता. स्वत:च निर्माण केलेल्या राजकीय संकटामुळे पाकिस्तानी लष्कर टीटीपीशी दोन हात करण्यास तयार नव्हते.

पाक सीमेवरून ६० टक्के लष्कर हटवण्यावर सहमती झाली होती {सीमेलगतच्या भागातून ६०% लष्करला परत बोलावणे आणि आपल्या छावण्यांपर्यंतच मर्यदित राहण्यावर सहमती झाली होती. {टीटीपी सदस्यांना अफगानिस्तान आणि पाकिस्तानात स्वतंत्रपणे फिरण्यासाठी सुरक्षित मार्ग देण्याबाबतही सहमती झाली होती. {अफगान तालिबानसोबत टीटीपीच्या संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तान लष्कर सुरक्षित मार्ग देईल.

बातम्या आणखी आहेत...