आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानेदरलँडच्या शालेय पुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारींच्या भ्रष्टाचाराविषयीचा धडा शिकवला जात आहे. या पुस्तकात झरदारींच्या भ्रष्टाचाराविषयीचा एक पूर्ण प्रकरण आहे. नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. त्यांच्यानुसार, भ्रष्टाचार किती वाईट असतो हे मुलांना कळावे यासाठी झरदारींविषयी एका प्रकरणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
आसिफ अली झरदारी पाकिस्तान पिपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष आहेत. ते 2008 ते 2013 पर्यंत राष्ट्रपती पदावर होते. त्यांचे पुत्र बिलावल भुट्टो झरदारी सध्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत.
बेनझीर यांच्या सरकारमध्ये झरदारी कमिशन घ्यायचे
झरदारींविषयी पाकिस्तानी वृत्तपत्र 'द न्यूज'ने एक वृत्त प्रकाशित केले आहे. यात नेदरलँडच्या शालेय पुस्तकातून शिकवल्या जाणाऱ्या धड्याचाही फोटो आहे. यात झरदारींच्या भ्रष्टाचाराचाही उल्लेख आहे. याशिवाय या धड्यात झरदारींसोबत नवाज शरीफ यांचाही उल्लेख आहे.
झरदारींच्या पत्नी बेनझीर दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान राहिल्या. पहिल्यांदा 1988 पासून ते 1990 पर्यंत आणि दुसऱ्यांदा 1993 ते 1996 दरम्यान. त्यावेळी झरदारींनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे बोलले जाते. अगदी तेवा झरदारींचे विरोधक त्यांना मिस्टर 10% असे संबोधायचे.
झरदारी प्रत्येक सरकारी कंत्राटात 10% कमिशन घ्यायचे असा आरोप आहे. म्हणूनच त्यांचे नाव मिस्टर 10% पडले होते. पाकिस्तानच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान बेनझीर भुट्टोंची 27 डिसेंबर 2007 रोजी हत्या झाली होती.
सोशल मीडियावर चर्चा
झरदारींचा भ्रष्टाचार आणि या धड्याचे प्रकरण रविवारी रात्री चर्चेत आले. एका सोशल मीडिया युझरने आपल्या अकाऊंटवर याचा स्क्रिनशॉट टाकताना कॅप्शनमध्ये लिहिले- पाकिस्तानसाठी यापेक्षा जास्त लाजिरवाणी बाब काय असू शकते. एका युझरने लिहिले - नेदरलँडच्या शालेय पुस्तकांत झरदारींच्या भ्रष्टाचाराविषयीचे धडे आहेत. एका युझरने लिहिले आहे - झरदारींच्या पार्टीला याचा कदाचित गर्व वाटत असेल.
धड्याचा मथळाही पाहा
या धड्याचा मथळाही अनोखा आहे. 'हे आहेत-पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती, मिस्टर 10% भ्रष्टाचारासाठी अटक' या मथळ्याखाली झरदारींचा फोटो आहे.
जियो न्यूजने या धड्यासंदर्भात नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला. जेणेकरून या धड्याविषयीचे चित्र स्पष्ट होईल. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झरदारींच्या भ्रष्टाचाराविषयी तिथल्या शालेय अभ्यासक्रमात पूर्ण प्रकरण आहे. 16 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना याविषयी शिकवले जाते. झरदारींच्या भ्रष्टाचाराविषयी इथली मुले ग्रुप डिस्कशनही करतात.
एका अधिकाऱ्याने सांगितले - हा जुन्या पुस्तकातील धडा आहे. आम्ही हा धडा प्रमाणित लेखातून घेतला आहे. सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात हा धडा आहे. तथापि, सरकारचे याच्याशी काही देणेघेणे नाही. कारण हा प्रकाशकांचा निर्णय असतो. तथापि, ते सरकारला आधीच सांगतात की पुस्तकात कोणती प्रकरणे आहेत.
पुस्तकानुसार- झरदारी आणि त्यांच्या बहिणीला मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगातही जावे लागले होते. ही केस अजूनही सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.