आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ९ मे रोजी झालेल्या अटकेनंतर उसळलेला हिंसाचार थांबलेला नाही. यादरम्यान, लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना सोपवलेल्या एका अहवालात शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या अहवालानुसार, इम्रानच्या अटकेनंतर लष्करी प्रतिष्ठानांमध्ये तोडफोड आणि हल्ल्यात सरकारही सहभागी होते. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार तोडफोड आणि लष्कराच्या मालमत्तेला नुकसान पोहोचवण्यासाठी गुप्तचर ब्युरोने(आयबी) सरकार समर्थकांना चिथावणी दिली. अशा पद्धतीने चिथावण्याचा उद्देश इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफला(पीटीआय) लष्कराचा शत्रू करणे होता. हा अहवाल मिलिटरी इंटेलिजेन्सने(एमआय) तयार केला आहे.
ऊर्जा सुरक्षा स्कॉलर सईद अाफ्रिदींच्या म्हणण्यानुसार, इम्रान यांना सत्ताच्युत केल्यानंतरच पीएमएल-एन नेते आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची टीम पीटीआय किंवा इम्रान यांच्यावर बंदी लावण्याची संधी शोधत होती. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीतही नवाज यांच्या टीमने पीटीआयवर बंदी लादण्यासाठी सहमती बनवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र, सरकारचा सहकारी पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल भुत्तो यांनी त्यास विरोध केला. नवाज यांचे निकटवर्तीय आणि सरकारचे दुसरे सर्वात शक्तिशाली मंत्री गृहमंत्री राणा सनाउल्ला तर निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. त्यांनी इम्रान यांना अनेकदा धमकी दिली आहे. एका मुलाखतीत राणा यांनी तर इथपर्यंत सांगितले होते की, इम्रान यांनी राजकारणाल असे काही वळण दिले की, आपल्यापैकी एकच अस्तित्वात राहू शकेल. आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न येत असेल तर असे कोणतेही पाऊल उचलण्यास कचरणार नाहीत जे लोकशाहीवादी असो की नसो. सईद यांच्यानुसार, सुप्रीम कोर्टाद्वारे ९ मे रोजी इम्रान यंाची अटक अवैध ठरवण्याआधी आणि नंतरच्या घटनांवर नजर टाकल्यास कट उघड होईल. इम्रान यांची लोकप्रियता सतत वाढत आहे.
इम्रान पंजाब व खैबर पख्तुनख्वात निवडणूक घेण्यासाठी सरकार आणि प्रतिष्ठानांवर दबाव टाकत होते. सरकार आणि लष्करी प्रतिष्ठानने इम्रानला रोखण्यासाठी त्यांना अटक करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात सरकारची तत्काळ पहिली प्रतिक्रिया तीव्र होती.
पीटीआय संपवून निवडणूक घेऊ इच्छिते सरकार :
विश्लेषकांनुसार, नवाज सूड घेणारे व्यक्ती आहेत. त्यांना इम्रानसोबत लष्कराचाही द्वेष आहे. टीव्ही अँकर आणि विश्लेषक वसीम बदामी यांच्यानुसार, नवाज यांच्यासाठी ही आदर्श स्थिती आहे की, शक्तिशाली लष्कर आणि पीटीआयला आमने-सामने उभे केले. लष्कराची प्रतिमा खराब व्हावी आणि इम्रान पूर्णपणे घेरले जावे.
इम्रान, त्यांची पत्नी बुशरासह ८० वर निर्बंध
शाहबाज सरकारने इम्रान आणि त्यांचा पक्ष पीटीआयच्या अडचणी वाढवल्या आहेत. गुरुवारी इम्रान, त्यंाची पत्नी बुशरा बीवीसह पीटीआयशी संबंधित ८० लोकांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले आहे. याचा अर्थ असा की, या यादीतील लोक देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. दुसरीकडे, लाहोरच्या कॉर्प्स कमांडर निवासावरील हल्ल्यासाठी १६ आरोपींवर लष्करी न्यायालयात खटला चालवण्यासाठी लष्कराकडे सोपवले आहे. आरोपींची ही पहिली बॅच असून ती आर्मी अॅक्टमध्ये लष्कराला सोपवली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.