आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोट झाला आहे. पोलिस व्हॅनचा स्फोट झाला आहे. यामध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 15 जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानस्थित दैनिक डॉनच्या वृत्तानुसार, सिबी आणि कच्छी सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानच्या बोलान भागातील कांब्री पुलावर ही घटना घडली. पोलिसांनी याला फिदाईन हल्ला म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकलवरून आलेल्या आत्मघाती हल्लेखोराने पाक सुरक्षा दलांना लक्ष्य केले. परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
कोणीही जबाबदारी घेतली नाही
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अब्दुल कुद्दुस बिझेन्जो यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आपला उद्देश साध्य करण्यासाठी असे हल्ले करत आहेत. ते मानवतेचा शत्रू आहेत. या घटनेची जबाबदारी आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने घेतली नसली तरी थेट आणि पहिला संशय तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपीवर आहे. कारण टीटीपीने यापूर्वीही पाकिस्तान पोलिसांवर मोठे हल्ले केले आहेत.
पाकिस्तानच्या मशिदीत स्फोट, 32 पोलिस ठार
पाकिस्तानातील पेशावर शहरातील पोलीस लाइन्समध्ये बांधलेल्या मशिदीत स्फोट झाला. याला आत्मघातकी हल्लाही म्हटले जात आहे. स्थानिक मीडिया खैबर न्यूजनुसार, आतापर्यंत 32 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर 158 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यातील 90 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने परिसराला वेढा घातला आहे. त्याच्या जवळच लष्कराच्या तुकडीचे कार्यालयही आहे. पोलिस लाइन्समध्ये उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट खूप शक्तिशाली होता आणि त्याचा आवाज 2 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटानंतर धूळ आणि धुराचे लोट दिसत होते. - येथे वाचा संपुर्ण बातमी.
पाकिस्तानात आयएसआयविरोधात हत्यारबंद पोलिस उतरले रस्त्यावर
पाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर लष्कराच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील पोलिसांनी गुप्तचर संस्था आयएसआयविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. बुधवारी खैबर पोलिस दलातील जवानांनी गणवेश घालून जोरदार घोषणाबाजी करीत सशस्त्र मोर्चा काढला. पेशावर प्रेस क्लबबाहेर निदर्शने करण्यात आली. खैबरच्या अनेक जिल्ह्यांत अशी निदर्शने झाली. - येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.