आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Bus Blast Kills 12, Including 9 Chinese Engineers; The Incident Shocked China, Putting Pressure On The Imran Government; News And Live Updates

कारवाया:पाकिस्तानात बस स्फोटांत चीनच्या 9 अभियंत्यांसह 12 जणांचा मृत्यू; घटनेमुळे चीनला धक्का, इम्रान सरकारवर दबाव

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणचे भवितव्य भूतकाळात असू शकत नाही : जयशंकर

दहशतवाद्यांचे वर्चस्व असलेल्या खैबर पख्तुनख्वाच्या काेहिस्तान जिल्ह्यात बुधवारी सकाळी बसमध्ये स्फाेट झाला. त्यात १० चिनी नागरिकांसह १२ जणांचा मृत्यू झाला, तर ३० लाेक जखमी झाले. चीन-पाकिस्तान इकाॅनाॅमिक काॅरिडाॅरशी (सीपीईसी) संबंधित एका प्रकल्पात काम करणारे अभियंते व सुरक्षा रक्षक हाेते. त्यांना स्थानिक वीज-पाणी प्रकल्पाच्या उभारणीसाठी नेले जात हाेते. त्यात पाकिस्तानच्या सैनिकाचाही मृत्यू झाला. स्फाेटामागील कारण स्पष्ट हाेऊ शकले नाही.

चीनच्या राजदूताने हा बाॅम्बहल्ला असल्याचा दावा केला. त्यानंतर इम्रान खानचे संसदीय सल्लागार बाबर अवान यांनी त्यास दुजाेरा दिला. चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाआे लिजिआन म्हणाले, हल्ल्याचा चीनला धक्का बसला. चीन या घटनेचा निषेध करते. या घटनेचा तपास करण्यात यावा आणि दाेषींना अटक करावी. प्रामाणिकपणे नागरिक व प्रकल्पाचे संरक्षण केले पाहिजे, अशी मागणी चीनने इम्रान सरकारकडे केली आहे.

भारताची महत्त्वाची भूमिका : रशिया
काबूलमध्ये रशियाच्या मोहिमेचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन म्हणाले, अफगाणिस्तानात सद्यस्थितीत शांतता नांदावी यासाठी भारत व इतर क्षेत्रीय देशांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. तालिबान आता वास्तव आहे. ते आता स्वीकारले पाहिजे. परंतु तालिबानशी चर्चेतून मार्ग काढता येऊ शकेल, असे आम्हाला वाटते. रशियाने अफगाणमध्ये काही दिवसांपासून लक्ष घालण्यास सुरूवात केली.

नाटो सैन्य माघारी ही चूक : जॉर्ज बुश
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी बुधवारी अफगाणिस्तानातून नाटो सैन्य मायदेशी जात असल्यावरून टीका केली. लोकांना ठार करण्यासाठी सूत्रे तालिबानकडे सोपवली जात आहेत. त्याचा सर्वाधिक फटका अफगाणच्या महिला व मुलींना बसणार आहे. ही मोठी चूक आहे. त्यामुळे मी व्यथित आहे. बुश बर्लिनमध्ये एका जर्मन वाहिनीच्या मुलाखतीत बोलत होते.

अफगाणचे भवितव्य भूतकाळात असू शकत नाही : जयशंकर
अफगाणिस्तानात तालिबानने पुन्हा हिंसाचाराच्या मार्गे देशातील बहुतांश क्षेत्रावर वर्चस्व मिळवले आहे. तालिबानच्या कारवाया जगाला मान्य नाहीत. खरे तर हिंसाचार व संघर्षात हाेरपळण्याचा अफगाणचा भूतकाळ राहिला आहे. परंतु हा भूतकाळ अफगाणिस्तानचे भवितव्य असू शकत नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.

चीनचा अनेक प्रकल्पांत सहभाग, कडक चौकशीची मागणी
पाकिस्तानात ६० हजार काेटी रुपयांच्या सीपीईसी प्रकल्पात चीनचा सहभाग आहे. त्याअंतर्गत रस्ते, बंदरे, वीज प्रकल्प तयार केले जात आहेत. त्यात माेठ्या संख्येत चिनी अभियंते, अधिकारी प्रत्यक्ष काम करत आहेत. स्थानिक संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी त्यास विराेध करत आहे. काही महिन्यांपूर्वी बंडखाेरांनी क्वेट्टामध्ये चीनच्या राजदूतांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला हाेता. त्या हाॅटेल उद्ध्वस्त झाले हाेते. वास्तविक या हाॅटेलमध्ये चीनचे राजदूत उतरलेले नव्हते. स्फाेटात पाच जणांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...