आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pakistan China Vs India Nuclear Weapons Number Update | China And Pakistan Have More Nuclear Weapons Than India, According To Latest Report

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलाढ्य देशांची यादी:अण्वस्त्रांच्या बाबतीत रशिया जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र; भारतापेक्षा अधिक अण्वस्त्र चीन आणि पाकिस्तानकडे

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनकडे 320 तर पाकिस्तानकडे 160 अण्वस्त्र; रशियाकडे तब्बल 6,375
  • अमेरिकेकडे 5,800 न्युक्लिअर वॉरहेड्स असल्याचा अहवालात दावा

चीन आणि पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक अण्वस्त्र असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालातील माहितीनुसार, चीनकडे तब्बल 320 आणि पाकिस्तानकडे आता 160 अण्वस्त्र आहेत. भारताकडे सद्यस्थितीला अण्वस्त्रांचा आकडा 150 असल्याचे यात सांगण्यात आले आहे. स्वीडनचे थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्युटने सिपरी रिपोर्ट 2020 जारी केले आहे. त्यामध्ये कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्र आहेत याची एक यादी जाहीर करण्यात आली.

जगातील 90% अण्वस्त्र रशिया, अमेरिकेकडे

सिपरीच्या आकडेवारीनुसार, जगभरातील सर्व देशांकडे असलेल्या अण्वस्त्रांपैकी 90 टक्के अण्वस्त्र जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. हे दोन्ही देश आता पारंपारिक शस्त्र नष्ट करत आहेत. त्यामुळेच या देशांकडे गतवर्षी अण्वस्त्रांच्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. हे देश आता जुने अण्वस्त्र हद्दपार करून नवीन आणि त्यापेक्षा कित्येक पटीने घातक असे अण्वस्त्र बनवत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब आहे असे सिपरी रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

लष्करी खर्चातही वाढ

अहवालाप्रमाणे, 2010 ते 2019 मध्ये शस्त्रास्त्र आणि लष्करी उपकरणांची खरेदी 5.5 टक्क्यांनी वाढली आहे. 2018 मध्ये लष्करी उपकरणांवर जवळपास 1917 हजार कोटी डॉलर (145 लाख कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत. ही 10 वर्षात लष्करी साहित्यांवर खर्च करण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम आहे. एवढेच नव्हे, तर 2019 मध्ये आफ्रिकी देशांनी सुद्धा आपला लष्करी खर्च 67% टक्क्यांनी वाढवल्याचे दिसून आले आहे.

आण्विक क्षमता वाढवत आहे चीन

चीन आपल्या अण्वस्त्रांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी चीन जमीन, हवा आणि समुद्रात हल्ले करणारे अत्याधुनिक अण्वस्त्र विकसित करत आहे. एवढेच नव्हे, तर अण्वस्त्र वाहून नेणारे लढाउ विमान सुद्धा या देशात विकसित केले जात आहेत. चीन आपल्या अण्वस्त्रांची माहिती जाहीर करत नाही. परंतु, भविष्यात शक्तीशाली शस्त्रास्त्र बनवणार असल्याची माहिती चीनने जगाला दिली.

जगात एकूण 13,400 अण्वस्त्र

सिपरीच्या अहवालानुसार, जगात सध्या 9 देशांकडे अधिकृतरित्या अण्वस्त्र आहे. त्या सर्वांकडे 13 हजार 400 अण्वस्त्र आहेत. यातील 6,375 अण्वस्त्र एकट्या रशियाकडे आणि 5,800 अण्वस्त्र अमेरिकेकडे आहेत.

रशिया : 6,375

अमेरिका : 5,800

फ्रान्स : 290

ब्रिटन : 215

चीन : 320

पाकिस्तान :160

भारत : 150

इस्रायल : 90

उत्तर कोरिया : 30 ते 40

बातम्या आणखी आहेत...