आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:'कर्ज फेडले नाही, तर आयएमएफ आपला अॅटम बॉम्ब घेऊन जाईल, याला वाचवण्यासाठी मी भीक मागतोय'-जावेद मियांदाद

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मी एक नवीन बँक अकाउंट उघडले आहे, प्रत्येक पाकिस्तानीने त्यात पैसे टाकावे'

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियांदाद म्हणाले की, देशावरील वाढत्या कर्जामुळे अॅट बॉम्ब धोक्यात आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडिओ जारी करुन, हा दावा केला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, जर पाकिस्तानने देशावरील कर्ज फेडले नाही, तर आयएमएफसारख्या संघटना त्यांचे अॅटम बॉम्ब घेऊन जातील. इतकच नाही, तर मियांदादने हे कर्ज फेडण्यासाठी एक बँक अकाउंटदेखील ओपन केले असून, पाकिस्तानी नागरिकांना त्यात पैसे जमा करण्याची अपील केली आहे.

'देशासाठी मी लोकांकडे भीक मागतोय'

मियांदाद यांनी शनिवारी रात्री ट्विटरवर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात म्हटले की, “मी नॅशनल बँक ऑफ पाकिस्तानमध्ये एक अकाउंट उघडले आहे. पाकिस्तानचा अॅटम बॉम्ब वाचवण्यासाठी मी पाक नागरिकांना यात पैसे जमा करण्याची भीक मागतो. जर आपण आयएमएफसारख्या संघटनांचे कर्ज फेडले नाही, तर ते आपला बॉम्ब घेऊन जातील. मला माहित आहे की, देशातील काही लोक आपल्या देशाला बुडवत आहेत. आत त्यांनी मला भीक देऊन आपल्या पापांचे प्रायश्चित करावे. परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनीदेखील आपले कर्तव्य पार पाडावे.”
 
इंटरनॅशनल बँक अकाउंट

मियांदाद भारताचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल दाऊद इब्राहिमचे व्याही आहेत. व्हिडिओत ते म्हणाले की, “माझे नवीन अकाउंट इंटरनॅशनल आहे आणि याचा वापर फक्त मी करेल. आपण आयएमएफचे कर्ज फेडणार. नागरिकांनी दर महिन्याला यात पैसे जमा करावेत. सध्या आपल्या देशावर खूप कर्ज आहे. आपण अजून कर्जाची मागणी आयएमएफकडे केली, तर ते आपले अॅटम बॉम्ब मागतील. या बॉम्बला वाचवण्यासाठी त्यांचे पैसे परत करावे लागतील. यासाठी मी तुमच्याकडे भीक मागतोय.” 

बातम्या आणखी आहेत...