आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पाकिस्तान यूएनएचआरसीमध्ये राहण्यास लायक नाही; यूएनच्या निगराणी संस्थेने फटकारले

इस्लामाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 188 देश लावू शकतात पाकिस्तानच्या उड्डाणांवर निर्बंध

पाकिस्तान यूएनएचआरसीमध्ये अर्थात मानवी हक्क आयोगात राहण्यासाठी लायक नसल्याची टीका संयुक्त राष्ट्राच्या निगराणी संस्थेने केली आहे. गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये व्यंगचित्रावरून शिक्षकाची हत्या झाली होती. ती योग्य असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ईशनिंदा सहन करता येऊ शकत नाही, असे इम्रान यांनी म्हटले होते. त्यांना मानवी हक्क संस्थेने फटकारले आहे. यूएनएचआरसीमधील आपली उपस्थिती सहनशीलतेपलीकडची आहे, असे संस्थेने म्हटले. त्यावर इम्रान खान यांचे माध्यम सल्लागार अर्सलान खालिद म्हणाले, यूएनएचआरसी मुस्लिमांबाबत पूर्वग्रही आहे.

एवढेच नव्हे तर ही संस्था इस्रायल समर्थक एनजीआे आहे, असा आरोपही त्यांनी केला. या संस्थेला संयुक्त राष्ट्राशी देणेघेणे नाही. त्यावर यूएनएचआरसीने पलटवार केला. पाकिस्तान मुस्लिमांचे संरक्षक असल्याचे ढोंग करतो. तो चीनच्या शिनझियांग प्रांतात १० लाखांहून जास्त उईगर मुस्लिमांच्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाबाबत काही बोलत नसल्याचा टोलाही निगराणी संस्थेने लगावला.

188 देश लावू शकतात पाकिस्तानच्या उड्डाणांवर निर्बंध
बनावट परवान्यांच्या प्रकरणात पाकिस्तानला आणखी एक झटका बसला. युरोपनंतर जगातील १८८ देश पाकिस्तानच्या उड्डाणांवर बंदी लागू करू शकतात. पाकिस्तानची विमानसेवा आंतरराष्ट्रीय नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यास सक्षम नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या एअरलाइन्सला निर्बंधाला तोंड द्यावे लागू शकते. बनावट वैमानिक परवाना घोटाळ्यामुळे ब्रिटन व युरोपीय संघाने आधीच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर सहा महिन्यांपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. केंद्रीय विमान उड्डाणमंत्री गुलाम सरवर खान यांनी पीआयएच्या १४१ सह २६२ वैमानिकांनी बनावट परवाने बनवले होते.

बातम्या आणखी आहेत...