आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेब्रुवारी २०२१ पासून २३ जूनदरम्यान सुपारी किलर गोहिर दोन वेळा रॉटरडॅमला गेला. १३ जून २०२१ रोजी गोहिरला नेदरलँड सरकारने लंडनला परत पाठवले. कारण तो बनावट आमंत्रणावर नेदरलँडमध्ये प्रवेश करू पाहत होता. त्यानंतर तो फ्रान्सला गेला. तेथे २-३ दिवस थांबला. नंतर रस्तेमार्गे रॉटरडॅमला पोहोचला. गोरायाच्या घराभोवती गोहिर रेकी करताना दिसला. त्याचे सीसीटीव्ही फुटेल कोर्टात सादर केले गेले.
ज्या स्टोअरमधून त्याने १९ इंच लांब चाकू खरेदी केला त्या फुटेजवरूनही सुपारीची पुस्ती होते. व्हॉट्सअॅप आणि सिग्नलवर हँडलरशी संवाद रिस्टोअर केले गेले. विशेष म्हणजे नेदरलँडच्या संस्थांना याची चाहूल लागली होती. त्यामुळे गोरायाला आधीच दुसऱ्या ठिकाणी हलवले होते. नेदरलँडने गोहिरबाबत ब्रिटनलाही सांगितले. नंतर गोहिरला लंडनच्या सेंट पॅनक्रास इंटरनॅशनल स्टेशनवर पकडून दहशतवादाचे कलम लावण्यात आले.
नेदरलँडमध्ये राहत असलेल्या पाकिस्तानी वंशाचा ब्लॉगर अहमद वकास गोराया याच्या हत्येचा कट युरोपच्या सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला. ३१ वर्षीय सुपारी किलर गोहिर खान पकडला गेला. लंडनच्या किंग्स्टन-ऑन-थेम्स क्राउन कोर्टात त्याच्याविरुद्ध खटला चालवला जात आहे. गोहिरवर आरोप आहे की त्याने पाकिस्तानी एजन्सीकडून नेदरलँडच्या रॉटरडॅममध्ये राहत असलेल्या गोरायाला मारण्यासाठी एक लाख पौंडाची (१.१ कोटी रु.) सुपारी घेतली होती.
गोराया पाकिस्तानातून निर्वासित असून रॉटरउॅमध्ये राहत आहे. कोर्टात सुरक्षा यंत्रणांनी हत्येमागील उद्देशाबाबत धक्कादायक माहिती सादर केली आहे. कोर्टाला सांगितले की, गोरायाला राजकीय कारणामुळे मारण्याचा कट होता. हिटमॅन गोहिर पाकिस्तानातील मुजामिल कमर नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता. सरकारी पक्षाने मोबाइल फोनचा रेकॉर्ड सादर करत कोर्टाला सांगितले की, गोहिर खानने कोड वर्डमध्ये आपल्या हँडलरला सांगितले होते की, ‘आम्ही युरोपात आमचे सर्वश्रेष्ठ काम करण्याचा प्रयत्न करू.’ ते डिकोड केल्यानंतर याचा अर्थ असा निघाला की, ‘पाकिस्तान सरकारसाठी गोरायाला मारण्याचा प्रयत्न करू.’
कोर्टात सादर केलेल्या या कायदेशीर दस्तऐवजातून स्पष्ट होते की, निर्वासनात असलेले पाकिस्तानी वंशाचे लोक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या युरोपात आता सुरक्षित नाहीत. गोरायांनी पाकिस्तानी सेना आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या विरोधात अनेक विषयांवर तिखट ब्लॉग लिहिले आहेत. २०१७ मध्ये ते पाकिस्तानात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले होते. युरोपच्या दबावापुढे ३ आठवड्यांनंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर ईशनिंदेचा खटलाही चालवला गेला. हा खटलाही इस्लामाबाद न्यायालयाने फेटाळल्यानंतर ते नेदरलँडला गेले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.