आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Imran Khan Arrest Update; Rangers Islamabad High Court | Former Pakistan Prime Minister | Imran Khan

पाकिस्तानात खळबळ:इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून अटक, VIDEO मध्ये गुप्तचर अधिकाऱ्यांवर आरोप, 4 तासांनी अटक, पक्षाचा दावा- खान यांचा छळ सुरू

इस्लामाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफने खान यांच्या अटकेनंतर आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. - Divya Marathi
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफने खान यांच्या अटकेनंतर आपल्या अधिकृत अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी रेंजर्स म्हणजेच निमलष्करी दलाने अटक केली. इम्रान खान 2 प्रकरणात जामिनासाठी उच्च न्यायालयात पोहोचले होते.

एका प्रत्यक्षदर्शीने पाकिस्तानचे वृत्तपत्र द डॉनला सांगितले की, इम्रान खान उच्च न्यायालयात दाखल होताच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही उच्च न्यायालयात दाखल झाली. दार चिलखती वाहनांनी अडवण्यात आले आणि काही वेळातच इम्रान यांना पकडून बाहेर आणण्यात आले.

अलीकडेच इम्रान खान यांनी इंटेलिजन्सच्या उच्च अधिकार्‍यांवर आरोप केला होता की त्यांनी वजिराबादमध्ये आपल्याला ठार मारण्याचा कट रचला होता. पाकिस्तानी लष्कराने हे आरोप फेटाळून लावले. यानंतर इम्रान यांनी आज एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोपांची पुनरावृत्ती केली. याच्या 4 तासांनंतर त्यांना न्यायालयातून अटक करण्यात आली.

हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी विचारले- त्यांना का आणि कोणत्या प्रकरणात अटक केली?

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव आणि इस्लामाबादचे पोलीस प्रमुख यांना अटक केल्यानंतर 15 मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती फारुख म्हणाले की, पोलीस प्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत, तर आम्ही पाकिस्तानच्या पंतप्रधानांना येथे बोलावू. या लोकांनी कोर्टात येऊन सांगावे की, इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का अटक करण्यात आली?

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. ही विद्यापीठाशी संबंधित केस आहे. इम्रान यांनी पंतप्रधान असताना या विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे दिली होती. या प्रकरणाचा खुलासा पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मलिक रियाझ यांनी केला आहे.

अटकेचा धाक दाखवून इम्रान आणि त्यांच्या पत्नीने कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर रियाझ आणि त्याच्या मुलीच्या संभाषणाचा एक ऑडिओ लीक झाला होता. यामध्ये रियाझ यांच्या मुलीचे म्हणणे आहे की, इम्रान यांची पत्नी बुशरा बीबी त्यांच्याकडे सतत पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागत आहेत. यावर रियाझ म्हणतात की, तिने जर सर्वकाही केले तर तिला पाच कॅरेटची अंगठी द्या.'

विशेष बाब म्हणजे अल कादिर विद्यापीठात केवळ दोन विश्वस्त आहेत. इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा. सुमारे 90 कोटींच्या या विद्यापीठात 6 वर्षांत केवळ 32 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 असे आहेत, ज्यात त्यांची अटक निश्चित आहे. यामुळेच खान यापैकी कोणत्याही प्रकरणात कोर्टात हजर राहत नाहीत.

इम्रान यांच्या पक्षाने व्हिडिओ केला शेअर, इम्रान खान यांचे वकील रक्ताने माखलेले दिसले

इम्रान आणि त्यांच्या वकिलाला कोर्टाबाहेर मारहाण केल्याचा आरोप इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केला आहे.
इम्रान आणि त्यांच्या वकिलाला कोर्टाबाहेर मारहाण केल्याचा आरोप इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयने केला आहे.

पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉनने वृत्त दिले आहे की, इम्रान यांच्या पक्ष पीटीआयने अटकेला दुजोरा दिला आहे. पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले- इम्रान खान यांच्यावर सध्या अत्याचार होत आहेत. ते खान साहेबांना मारत आहेत. इम्रान यांच्या वकिलाचा व्हिडिओही पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. पक्षाने म्हटले आहे की, इम्रान यांना उच्च न्यायालयाबाहेर बेदम मारहाण करण्यात आली.

इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ माजला होता.
इम्रान खान यांच्या अटकेनंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर गोंधळ माजला होता.

इम्रान यांना लष्कराशी वैर महागात

2018 मध्ये इम्रान खान यांना लष्करानेच पंतप्रधान बनवले होते. नंतर आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या बदलीवरून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर लष्कराने शाहबाज शरीफ यांची बाजू घेत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान यांचे सरकार पाडले होते.

यानंतर खान यांनी लष्कराविरोधात वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. त्यांनी बाजवा यांना देशद्रोही म्हटले. रविवारी एका सभेत खान यांनी एका वरिष्ठ लष्करी अधिकारी फैसल नसीर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला.

सोमवारी लष्कराच्या मीडिया शाखेने एक व्हिडिओ जारी केला. त्यात म्हटले की- खान चुकीचे आरोप करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यानंतर इम्रान खान यांनी मंगळवारी इस्लामाबाद हायकोर्टातून बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा एक व्हिडिओ जारी केला. म्हणाले- पाकिस्तान फक्त लष्कराचा नाही. मी सत्य सांगितले आहे. एका लष्करी अधिकाऱ्याने मला मारण्याचा दोनदा कट रचला आहे. मला मृत्यूची भीती वाटत नाही. यानंतर त्यांनी लगेचच उच्च न्यायालयात धाव घेतली. येथेच पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना अटक केली.