आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही पाकिस्तानच्या 4 पंतप्रधानांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. क्रिकेटच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचे हिरो ठरलेल्या इम्रान यांच्याविरुद्ध 108 गुन्हे दाखल आहेत. त्यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
इम्रान हे पाकिस्तानी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार राहिलेले आहेत. याशिवाय ते सुमारे साडेचार वर्षे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. मात्र, या काळात त्यांचे जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. कधी बॉल टॅम्परिंग, तर कधी ओसामा बिन लादेनला शहीद म्हणणारे माजी पंतप्रधान नेहमीच वादग्रस्त ठरले होते.
जाणून घ्या, इम्रान यांच्या राजकीय व्यक्तिरेखेसह त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादांबद्दल…
क्रिकेटर असताना बॉल टॅम्परिंगच्या वादात अडकले
इम्रान खान यांच्या कारकिर्दीत अशा दोन घटना घडल्या, ज्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंट मानल्या जातात. पहिली- 1992 क्रिकेट विश्वचषकातील पाकिस्तानचा विजय आणि दुसरी- 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाची स्थापना.
इम्रान हे क्रिकेट जगतातील पहिले पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू आहेत. 1987 मध्ये त्यांनी पाकिस्तानची भारतात पहिली कसोटी मालिका जिंकली. त्यावेळी पाकिस्तानचे हुकूमशहा झिया-उल-हक यांनी खान यांना पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल) मध्ये सामील होण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, इम्रान यांनी ही ऑफर फेटाळून लावली.
इम्रान यांच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये पाकिस्तानने पहिला विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्यांच्या भरभराटीच्या क्रिकेट कारकिर्दीत इम्रान वादांचाही एक भाग होता. 1994 मध्ये त्याने काउंटी सामन्यादरम्यान बॉल टॅम्परिंग केल्याचे कबूल केले. 1996 मध्ये इयान बॉथम आणि अॅलन लॅम्ब या दोन इंग्लिश क्रिकेटपटूंनी इम्रानवर वर्णद्वेषाचा दावा केला होता. त्याला कोर्टाकडून दिलासा मिळाला असला तरी.
पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव
1996 मध्ये प्रथमच इम्रान यांच्या पक्ष पीटीआयने केवळ 7 जागा लढवल्या होत्या, परंतु तेव्हा त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, हळूहळू इम्रान यांचा राजकीय अनुभव आणि पक्षाचे कॅडर दोन्ही वाढत गेले. 1999 मध्ये कारगिल युद्धात झालेल्या दारुण पराभवानंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पदच्युत केले.
त्यावेळी इम्रान यांनी उघडपणे या सत्तापालटाचे समर्थन केले, परंतु 2002 पर्यंत ते मुशर्रफ यांचे विरोधक बनले. त्याच वर्षी इम्रान यांचा पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरला, यावेळी त्यांना 272 पैकी केवळ 1 जागा मिळू शकली.
मुशर्रफ यांनी फाशीची मागणी केली, त्यानंतर ते तुरुंगातून पळून गेले
3 नोव्हेंबर 2007 रोजी राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली. त्यानंतर इम्रान यांनी मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, मात्र ते तेथून फरार झाले. यानंतर मात्र त्यांना गाझी खान तुरुंगात ठेवण्यात आले होते. 21 नोव्हेंबरला उर्वरित राजकीय कैद्यांसह इम्रान यांचीही सुटका करण्यात आली होती.
झरदारींनीही इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले
यानंतर पीटीआयने 2008च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. थेट रस्त्यावर उतरून सरकारविरोधात मोर्चा उघडला. यानंतर 2009 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी इम्रान यांना नजरकैदेत ठेवले होते. 2013 मध्ये इम्रान खान यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली आणि पाक-अफगाण सीमा भागात अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यांना विरोध केला.
पाकिस्तानच्या राजकारणात 26 वर्षांनी प्रवेश केल्यानंतर 2018 मध्ये इम्रान खान पंतप्रधान झाले. यानंतर त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली.
गतवर्षी एका मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते - महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीचे कारण म्हणजे त्यांचा पेहराव. महिलांनी लहान कपडे घातले तर साहजिकच पुरुषांना त्याचा फटका बसेल. यामुळेच समाजासाठी पर्दा पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय इम्रान यांनी पाकिस्तानमध्ये वाढत्या लैंगिक गुन्ह्यांसाठी मोबाइल फोनला जबाबदार धरले होते.
याशिवाय 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अखेर तेथील लोकांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाल्याचे इम्रान खान म्हणाले होते. याशिवाय नॅशनल असेंब्लीमध्ये एका वक्तव्यादरम्यान खान म्हणाले होते की, पाकिस्तानसाठी सर्वात लाजिरवाणा दिवस तो होता, जेव्हा अमेरिकन लोकांनी आमच्या देशात घुसून ओसामा बिन लादेनला ठार मारले. तो शहीद झाला. मात्र, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर खान यांनी बोलताना जिभेवरचा ताबा सुटल्याचे म्हटले होते.
तोशाखान्याच्या भेटवस्तू 20 कोटींना विकल्या
सत्ताधारी पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटने तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगासमोर उपस्थित केले होते. इम्रान यांनी आपल्या कार्यकाळात वेगवेगळ्या देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्याचे त्यांनी म्हटले होते. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, त्यांनी या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्यांची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.
पाकिस्तानी पत्रकार आरिफ अजकिया आणि इमदाद अली शुमरो यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान यांना सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी सोन्याने बनवलेले आणि हिरेजडित महागडे घड्याळ भेट दिले होते. त्यांनी दोन लिमिटेड एडिशन घड्याळे बनवून घेतली होती. एक स्वतःजवळ ठेवले. दुसरे इम्रान यांना भेट दिले होते. त्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये होती.
विक्रीची माहिती कशी उजेडात आली?
सुमारे दोन वर्षांपूर्वी अबरार खालिद नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीने माहिती आयोगात अर्ज दाखल केला होता. त्यात विचारणा केली होती की- इम्रान यांना इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती द्यावी. उत्तर मिळाले - भेटवस्तूंचे तपशील दिले जाऊ शकत नाहीत. खालिदही हट्टाला पेटले. त्यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
इस्लामाबाद हायकोर्टाने इम्रान यांना विचारले की- तुम्ही भेटवस्तूंची माहिती का देत नाहीत? यावर खान यांच्या वकिलाने उत्तर दिले - यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. इतर देशांशी संबंध बिघडू शकतात. म्हणूनच इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती आम्ही लोकांना देऊ शकत नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.