आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • International
 • Pakistan Ex PM Imran Khan Secret Daughter | Islamabad High Court On False Affidavit Case | Imran Khan News | Tyrian White

खोटे प्रतिज्ञापत्र प्रकरणात इम्रान खान अडकले:उच्च न्यायालयाने विचारलं - तारीन व्हाइट तुमची मुलगी आहे की नाही, 19 जानेवारीपर्यंत सविस्तर उत्तर द्या

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एका अडचणीत आले आहेत. निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल इम्रान खान यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे राहणाऱ्या मॉडेल सीता व्हाईट यांची मुलगी असलेल्या तारीनचे आपण वडील आहोत की नाहीत, हे 19 जानेवारीपर्यंत त्यांनी स्पष्ट करावे, असे मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने एका आदेशात म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने म्हटले की, खान यांचे वकील त्यांच्या वतीने या प्रकरणी उत्तर देऊ शकतात. उत्तरांसह पुरावेही द्यावे लागणार आहेत. या प्रकरणी पुढे काय कारवाई करता येईल याचा निर्णय 19 जानेवारी रोजी उच्च न्यायालय देणार आहे.

इम्रान यांनी शपथपत्रात जेमिमा गोल्डस्मिथसोबत दोन मुले असल्याची कबुली दिली होती. मात्र माजी गर्लफ्रेंड सीता व्हाईट यांच्या मुलीची तारीन व्हाईटची माहिती दिली नव्हती. इम्रान खान हे तारीनचे वडील असल्याचे अमेरिकन आणि ब्रिटिश कोर्टात सिद्ध झाले आहे.

हा फोटो इम्रान खान यांच्या तिन्ही मुलांचा आहे. खान यांनी सुलेमान आणि कासिम या मुलांना आपले नाव दिले. परंतू मुलगी तारीनला त्यांचे नाव दिले नाही.
हा फोटो इम्रान खान यांच्या तिन्ही मुलांचा आहे. खान यांनी सुलेमान आणि कासिम या मुलांना आपले नाव दिले. परंतू मुलगी तारीनला त्यांचे नाव दिले नाही.

सुनावणीदरम्यान इम्रानच्या वतीने पाकिस्तानचे तीन प्रसिद्ध वकील हजर झाले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अमीर फारुक यांनी त्यावर सुनावणी केली. सलमान अक्रम राजा, अझहर सिद्दीकी आणि अब्दुजर सलमान नियाझी हे इम्रानची बाजू मांडणारे वकील होते. निवडणूक आयोगाच्या वतीने अॅटर्नी जनरल न्यायालयात हजर होते.

सरन्यायाधीश इम्रानच्या वकिलांना म्हणाले की, जर तुमच्या अशिलाने निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिले असेल तर त्यांना घटनेच्या कलम 62 (i) (f) नुसार निवडणूक लढवण्यास अपात्र का ठरवले जाऊ नये? तुम्ही सविस्तर उत्तरे पुराव्यासह लेखी द्या. 19 जानेवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे.

इम्रान यांची पहिली पत्नी जेमिमासोबत तारीन व्हाईट. जेमिमा तारीनला तिची सावत्र मुलगी म्हणून संबोधते. दोघांचे हे चित्र गेल्या वर्षीचे आहे.
इम्रान यांची पहिली पत्नी जेमिमासोबत तारीन व्हाईट. जेमिमा तारीनला तिची सावत्र मुलगी म्हणून संबोधते. दोघांचे हे चित्र गेल्या वर्षीचे आहे.

याचिकेत काय म्हटले आहे

 • इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अमीर फारूक हे या प्रकरणी सुनावणी करत आहेत. यावरुनच हे प्रकरण किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो.
 • सामाजिक कार्यकर्ते साजिद मेहमूद यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) प्रमुख इम्रान यांनी शपथपत्रात सांगितले होते की, त्यांना दोन मुले आहेत. कासिम आणि सुलेमान खान अशी त्यांची नावे आहेत. दोघेही खानची घटस्फोटित पत्नी जेमिमासोबत यूकेमध्ये राहतात. इम्रानने अमेरिकेत राहणाऱ्या 28 वर्षीय तारीन व्हाईटचे नाव का दिले नाही? तारीनची आई सीता व्हाईट आणि इम्रान यांचे अफेअर असल्याचे अमेरिकन आणि ब्रिटिश कोर्टात सिद्ध झाले आहे.
 • याचिकेत म्हटले होते की, इम्रान हे तारीनचे पिता आहेत आणि त्याचे सर्व पुरावे आहेत. याचा अर्थ खान यांनी घटनेच्या अनुच्छेद 62 चे उल्लंघन केले आणि खोटे प्रतिज्ञापत्र दिले. त्यामुळे त्यांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे. इस्लामनुसार, कोणत्याही उमेदवारासाठी सादिक आणि अमीन (सत्य आणि प्रामाणिक) असणे आवश्यक आहे.
 • देशाचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनीही इम्रान यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली. राणा यांनी मीडियाला सांगितले की, तारीन व्हाईट ही इम्रान खानची मुलगी आहे यात शंका नाही. याचे अनेक ठोस पुरावेही आपल्याकडे आहेत. खान यांनी जरी आपण तारीनचे वडील असल्याचे नाकारले असले तरी वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे आहेत आणि इम्रान जितके खोटे बोलत आहेत. तेवढेच ते अडकत चालले आहेत.
 • राणा पुढे म्हणाले की, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या उच्च न्यायालयाने खान यांना तारीनचे वडील घोषित केले आहे. ब्रिटनच्या न्यायालयानेही हाच निर्णय दिला. खानची पहिली पत्नी जेमिमा स्वतः तारीनला तिची सावत्र मुलगी म्हणते. उच्च न्यायालयाने बजावलेल्या नोटीसला सविस्तर उत्तर दिले जाईल आणि त्यात सर्व पुरावेही नमूद केले जातील. खान यांची वृत्ती अत्यंत बेजबाबदार आहे.
मुलगी टायरियन सोबत इम्रान यांचे हे एकमेव छायाचित्र. सीताने 3 वर्षांपर्यंत मुलीच्या वडिलांची ओळख जगापासून लपवून ठेवली होती. इम्रान यांनीही आपल्या आत्मचरित्रात याचा कुठे उल्लेख केला नाही.
मुलगी टायरियन सोबत इम्रान यांचे हे एकमेव छायाचित्र. सीताने 3 वर्षांपर्यंत मुलीच्या वडिलांची ओळख जगापासून लपवून ठेवली होती. इम्रान यांनीही आपल्या आत्मचरित्रात याचा कुठे उल्लेख केला नाही.

खान अमेरिकन न्यायालयाच्या आदेशाने अडकले

 • 13 ऑगस्ट 1997 रोजी कॅलिफोर्निया उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अँथनी जोन्स यांनी इम्रानला तारीनचे वडील असल्याचे घोषित केले. न्यायमूर्ती जोन्स यांनी निकालात म्हटले होते की, सर्व वैद्यकीय अहवाल आणि तपासातून हे स्पष्ट झाले आहे की, इम्रान हे तारीन व्हाईटचे वडील आहेत. तारीनची आई सीता व्हाईट आणि खान यांचे 1987-88 पासून नाते होते. इम्रानने तपासात मदत करण्यास नकार दिला. तारीन सद्या वेबरली हिल्समध्ये राहतात.
 • तारीनचा जन्म 15 जून 1992 रोजी झाला होता. यूएस हायकोर्टात ​​​​​​सुनावणीदरम्यान सीता यांच्या वकिलाने सांगितले की, खान यांनी तारीनशी कधीही चर्चा केली नाही. तथापि, ते तारीनची आई सीता यांच्या संपर्कात राहतात. सीता व्हाईट यांचे 2004 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
 • सुनावणीदरम्यान इम्रान खान यांचे वकील म्हणाले- 1992 पूर्वी माझे क्लायंट सक्रिय क्रिकेटर होते. त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या. नाईट क्लब आणि पबमध्ये जायचे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते कट्टर धार्मिक व्यक्ती बनले.
 • तारिन सध्या 28 वर्षांची असून ती अमेरिकेत राहते. आईचे नाव सीता ़आहे. खानही तारीनला सतत पैसे पाठवतात आणि त्याचे पुरावेही आहेत.
1995 मध्ये 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' या ब्रिटिश वृत्तपत्राने वैद्यकीय अहवालाच्या आधारे इम्रान खान हे तारीनचे वडील असल्याचे स्पष्ट केले होते. नंतर न्यायालयानेही तेच सांगितले.
1995 मध्ये 'न्यूज ऑफ द वर्ल्ड' या ब्रिटिश वृत्तपत्राने वैद्यकीय अहवालाच्या आधारे इम्रान खान हे तारीनचे वडील असल्याचे स्पष्ट केले होते. नंतर न्यायालयानेही तेच सांगितले.

नवाझ शरीफ यांनाही अशा प्रकारे अपात्र ठरवण्यात आले
पाकिस्तानच्या राज्यघटनेच्या कलम 62 (1) नुसार निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कोणतीही खोटी माहिती असू नये. विजयी झाल्यानंतर उमेदवारावर खोटी माहिती दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यास तो निवडणूक लढण्यास अपात्र ठरतो. 28 जुलै 2017 रोजी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना याच कलमाखाली निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले होते. पनामा पेपर्स प्रकरणात खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

इम्रान यांची सीक्रेट लाइफ:लग्नापूर्वीच झाले होते एका मुलीचे वडील

वाद...हा जवळपास सर्वच राजकारण्यांच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असतो. पाक पंतप्रधान इम्रान खान हे ही याला अपवाद नाहीत. त्यांचेही आयुष्य अनेक 'रंगबेरंगी' वादांनी भरलेले आहे. तीनवेळा बोहल्यावर चढलेल्या इम्रान यांच्या प्रेमाच्या यादीत बॉलिवूडपासून जगभरातील श्रीमंत महिलांचा समावेश आहे. अशीच एक महिला आहे...सीता व्हाइट. ही महिला इम्रान यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या स्कँडलचे कारण ठरली. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...