आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका हातात कुराण-दुसऱ्या हातात बॉम्ब, PAK नेत्याचा सल्ला:देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगितला, म्हणाले - भीक मागून काही होणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानला आर्थिक संकट आणि महागाईतून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानातील एका नेत्याने अजब सल्ला दिला आहे. एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घ्या, मग बघा कोण पैसे देत नाही, असे तेहरीक-ए-लबाइक पाकिस्तान पक्षाचे नेते मौलाना साद रिझवी यांनी म्हटले.

त्यांच्या या वक्तव्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानमध्ये सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीन आणि सौदीसह अनेक देशांकडून मदत मागितली. यावर मौलाना साद रिझवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

तेहरीक-ए-लबाइक पाकिस्तान पक्षाचे नेते मौलाना साद रिझवी भाषण करत होते. तेव्हा तिथे अनेक लोक उपस्थित होते.
तेहरीक-ए-लबाइक पाकिस्तान पक्षाचे नेते मौलाना साद रिझवी भाषण करत होते. तेव्हा तिथे अनेक लोक उपस्थित होते.

लष्करप्रमुखांसह वजीर-ए-आझम भीक मागत होते
सरकारवर टीका करताना साद रिझवी म्हणाले की, तुम्ही जगाकडे पदर पसरवला. पण, तुम्हाला कोणीही भीक दिली नाही. वझीर-ए-आझमसह संपूर्ण मंत्रिमंडळ जहाजात भरून आणि लष्करप्रमुखांना समोर ठेवून तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात भीक मागितली. पण, तुम्हाला प्रत्येकाने अटी मान्य करायला लावल्या.

यानंतर मौलाना साद रिझवी यांनी पाकिस्तानला लवकर कर्ज मिळण्याचे मार्ग सांगितले. ते म्हणाले की, तुम्ही पैसे मागण्यासाठी का जात आहात? याप्रकारे भीक मागण्यापेक्षा एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात अणुबॉम्ब घ्या आणि स्वीडनला जा. मग बघा संपुर्ण जगाने तुमच्यापुढे नमते नाही घेतले तर माझे नाव बदला.

कुराण जाळण्याच्या घटनांमुळे साद रिझवी यांनी स्वीडनचा उल्लेख केला. खरे तर, गेल्या काही काळापासून रासमुस पालुदान नावाचा उजव्या विचारसरणीचा तरुण दर शुक्रवारी कुराण जाळत आहे. ज्याचा पाकिस्तानसह अनेक इस्लामिक देशांनी निषेध केला आहे.

पाक पंतप्रधान म्हणाले- कर्जासाठी कठोर अटी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी कबूल केले आहे की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने 1.2 अब्ज डॉलरच्या तिसऱ्या टप्प्याचे कर्ज देण्यासाठी अत्यंत कठोर अटी घातल्या आहेत. शरीफ म्हणाले की, IMF ने ठेवलेल्या अटी जास्त कठोर आणि धोकादायक आहेत. पण आम्ही काय करु शकतो? आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये गुरुवारी महागाईचा दर वाढून 27.8% झाला. सप्टेंबर 2022 मध्ये विदेशी कर्ज $130.2 अब्ज होते. त्यानंतर ही आकडेवारी जाहीर झाली नाही. डॉलरच्या तुलनेत रुपया (पाकिस्तानी चलन) 274 झाला आहे.

पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यूएईला गेले होते. शेख झायेद यांची त्यांनी भेट घेतली होती.
पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यूएईला गेले होते. शेख झायेद यांची त्यांनी भेट घेतली होती.

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आणि लष्करप्रमुख सौदी अरेबियात

जनरल सय्यद असीम मुनीर यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख झाल्यानंतर दीड महिन्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी सौदी अरेबियाला भेट दिली.

यापूर्वी मे 2022 मध्ये सौदी अरेबियाला गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सौदीकडून 8 अब्ज डॉलरचे एकूण मदत पॅकेज मिळवण्यात यश आले होते. यावेळी सौदी अरेबियाने पाकिस्तानला तेलासाठी दिलेली आर्थिक मदत दुप्पट करण्याचे आश्वासनही दिले.

ऑगस्ट 2018 मध्ये इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यानंतर पहिल्याच महिन्यात ते सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर गेले. इम्रान खान यांनी त्यांच्या सुमारे 4 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 32 परदेश दौरे केले, ज्यामध्ये ते 8 वेळा सौदी अरेबियाला गेले.

पाकिस्तानात पेट्रोल 249 रुपये लिटर

पाकिस्तानात पेट्रोल 16 टक्के महाग झाले आहे. अर्थमंत्री इशहाक डार यांनी रविवारी म्हटले की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 35 रुपयांनी वाढवल्या आहेत. आधी पेट्रोलची किंमत 214 रुपये प्रतिलिटर होती, ती आता 249 रुपये प्रतिलिटर झाली आहे.

आर्थिक संकटात फसलेल्या पाकिस्तानच्या शाहबाझ शरीफ सरकारने सर्व पेट्रोलियम उत्पादनांची किंमत वाढवली आहे. यासोबतच तिथे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. डिझेलची किंमत 262 रुपये आणि रॉकेल 187 रुपये प्रतिलिटर झाले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.

बातम्या आणखी आहेत...