आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पुरामुळे आणीबाणी जाहीर:तीन महिन्यांत 900 हून अधिक जणांचा मृत्यू; इतर देशांकडून मदतीसाठी आवाहन

इस्लामाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानला पूर आणि पावसाचा फटका बसला आहे. पाकिस्तानातील पूरस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिथे 900 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे आतापर्यंत 937 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 343 मुलांचाही समावेश आहे.

सर्वाधिक मृत्यू सिंध प्रांतात

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) च्या अहवालात म्हटले आहे की, 14 जूनपासून सिंध प्रांतात 306 लोकांचा मृत्यू झाला आहे, हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. कराची, पंजाब, बलुचिस्तान प्रांतातील परिस्थिती गंभीर असून हवामान खात्याकडून इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर बलुचिस्तानमध्ये 234 जणांचा मृत्यू झाला आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये 185 आणि पंजाब प्रांतात 165 लोकांचा मृत्यू झाला असून गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानचे रस्ते पाण्याखाली गेलेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीही लोकांना जीव धोक्यात घालून बाहेर पडावे लागत आहे.
पाकिस्तानचे रस्ते पाण्याखाली गेलेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीही लोकांना जीव धोक्यात घालून बाहेर पडावे लागत आहे.
पावसाच्या पाण्याला वाट न मिळाल्याने पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.
पावसाच्या पाण्याला वाट न मिळाल्याने पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे.

23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

NDMA नुसार, ऑगस्ट महिन्यात पाकिस्तानमध्ये 241% जास्त पाऊस झाला. तिथे सरासरी 166.8 मिमी पावसाची नोंद झाली. तर दरवर्षी सरासरी 48 मिमी पाऊस पडतो. सिंधमध्ये 784% आणि बलुचिस्तानमध्ये 496% जास्त पाऊस झाला. सिंध प्रांतातील 23 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाक लष्कराकडून बचाव कार्य

हवामान बदल मंत्री शेरी रहमान यांनी सांगितले की, पाकिस्तानी लष्कर आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्यात गुंतले असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे. सुमारे 3 कोटी लोक बेघर झाले आहेत. बलुचिस्तान प्रांताच्या प्रशासनाने लोकांना राहण्यासाठी 1 लाख तंबूंची मागणी केली आहे.

सिंध प्रांतातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की तेथे दहा लाख तंबूंची मागणी करण्यात आली आहे.
सिंध प्रांतातील परिस्थिती इतकी गंभीर आहे की तेथे दहा लाख तंबूंची मागणी करण्यात आली आहे.
गंभीर परिस्थिती पाहता अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
गंभीर परिस्थिती पाहता अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.

सरकारकडून इतर देशांना मदत निधीचे आवाहन

पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात पाकिस्तान सरकार अपयशी ठरताना दिसत असून यासाठी सरकारने इतर देशांची मदत मागितली आहे. एका अहवालानुसार, सरकारला 5.78 लाख कोटी रुपयांच्या मदत निधीची गरज आहे. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रासाठी 12.9 हजार कोटींची गरज आहे. पुरामुळे शेत आणि पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकारला 9 अब्ज रुपयांची (भारतीय चलनात 72.08 हजार कोटी रुपये) गरज आहे. मुसळधार पावसामुळे यंत्रांचेही नुकसान झाले. त्याची भरपाई करण्यासाठी 4.64 अब्ज रुपये 37.07 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

82 हजार घरांचे नुकसान

माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पुरामुळे 82,000 घरांचे नुकसान झाले आहे. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी 41 अब्ज रुपये (3.27 लाख कोटी रुपये) इतका कारच येऊ शकतो. म्हणजेच प्रत्येक घरासाठी 50 हजार रुपये खर्च येणार आहे. भरपाईसाठी इतर देशांकडून मदतीची विनंती केली जात आहे. सरकार जनतेच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून या कठीण काळात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे असे देखील ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...