आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:बेनझीर भुत्तो यांच्या मुलीचा उद्योगपतीच्या मुलासोबत होणार विवाह; पाहुण्यांना कोविड अहवाल द्यावा लागेल

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराचीतील बिलावल हाऊसमध्ये होणार साखरपुडा समारंभ

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो आणि माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची मुलगी बख्तावर भुत्तो झरदारी हिचा २७ नोव्हेंबरला साखरपुडा होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बख्तावर अमेरिकी वंशाच्या एका उद्योगपतीच्या मुलासोबत विवाह करत आहे.]

पीपीपी मीडिया सेलने दिलेल्या माहितीनुसार पक्षाध्यक्ष आसिफ झरदारी यांनी म्हटले आहे की, बख्तावरचा साखरपुडा २७ नोव्हेंबरला महमूद चौधरी यांच्यासोबत होईल. महमूद (३०) व्यावसायिक युनूस चौधरी यांचा मुलगा आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब अमेरिकेत असते आणि त्यांचा दुबईतही व्यवसाय आहे. इंग्रजी वृत्तपत्र द डॉन नुसार साखरपुडा समारंभ कराचीतील बिलावल हाऊसमध्ये होईल. येथेच २१ जानेवारी २०२१ रोजी मेहंदी समारंभ होईल. यात सहभागी होणाऱ्या लोकांना कार्यक्रमाच्या २४ तास आधी कोविड- १९ चा निगेटिव्ह अहवाल ई मेल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. म्हणजे त्यांचे येणे पक्के करता येईल. तसेच समारंभात छायाचित्र काढणे आणि मोबाइल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. बख्तावर पाकिस्तानच्या नागरिकांच्या हक्कांसाठी सक्रिय असते.