आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील घृणास्पद कृत्य:धर्मांधांनी गणेश मंदिराची तोडफोड केली, मूर्ती फोडल्या; व्हिडिओ व्हायरल होऊनही स्थानिक सरकारचे मौन

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात पुन्हा एकदा कट्टरपंथीयांनी मंदिराला लक्ष्य केले आहे. हे प्रकरण पंजाबमधील भोंग शहरातील आहे. धार्मिक कट्टरपंथीयांनी दिवसाढवळ्या स्थानिक गणेश मंदिराला लक्ष्य केले. मंदिर तोडफोडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांना कसे ठेचले जात आहे, त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.

मूर्ती खंडित केल्या
कट्टरपंथीयांनी मंदिर पूर्णपणे उद्धवस्त केले. मूर्ती फोडण्यासही मागेपुढे पाहिले नाही. झुंबर आणि काचेची सजावटही फोडली. मंदिरावरील या हल्ल्यानंतर स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संताप आहे. असे असूनही स्थानिक प्रशासन हे प्रकरण लपवण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. व्हिडिओमध्ये सर्व हल्लेखोरांचे चेहरे स्पष्टपणे दिसत आहेत.

PTI ने हल्ल्याचा निषेध केला
इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते आणि हिंदू पंचायतीचे संरक्षक जय कुमार धिरानी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले, 'जिल्ह्यातील भोंग शरीफमधील मंदिरावरील या भयंकर हल्ल्याचा तीव्र निषेध. हा हल्ला म्हणजे पाकिस्तानविरुद्धचा कट आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की दोषींना तुरुंगात टाका.

बातम्या आणखी आहेत...