आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Ganesh Temple Attack What Would The Community Have Felt If The Mosque Had Been Attacked? Pak Court Ruled

हिंदू मंदिरावर हल्ला:मशिदीवर हल्ला झाला असता तर समुदायास काय वाटले असते? पाक कोर्टाने सुनावले

इस्लामाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने रहिमयार खान जिल्ह्यात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिस व इतर अधिकाऱ्यांना फटकारले. दोषींना अटक करण्याचे शुक्रवारी आदेश दिले. घटनेच्या वेळी पोलिस मूकदर्शक बनले होते, असे कोर्टाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती गुलजार अहमद यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पाकिस्तान हिंदू परिषदेचे प्रमुख डॉ. रमेश कुमार यांनी गुरुवारी न्यायमूर्तींची भेट घेतली होती. त्यानंतर कोर्टाने स्वत:हून या प्रकरणात खटला सुरू केला आहे.

पोलिस महासंचालक इनाम गनी यांना कोर्टाने धारेवर धरले. मंदिरावर हल्ला झाला तेव्हा पोलिस व प्रशासन काय करत होते? या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगभरातील प्रतिमेची हानी झाली आहे. त्यावर गनी म्हणाले, प्रशासनाने मंदिर परिसरातील ७० हिंदूंच्या घरांचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले होते.त्यावर न्यायमूर्तींचे समाधान झाले नाही. अधिकारी काम करत नसतील तर त्यांना पदावरून काढून टाकले पाहिजे. मंदिराला उद्ध्वस्त करण्यात आले. विचार करा. मशिदीवर हल्ला झाला असता तर मुस्लिम समुदायाची प्रतिक्रिया काय असती? असे न्यायमूर्तींनी सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ ऑगस्टला होईल.