आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रस्त शेजारी:पाकिस्तान दिवाळखोरीकडे!, 19 हजार कोटींची मदत देण्यास चीनचा नकार

इस्लामाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या शाहबाज सरकारसाठी रिकामी तिजोरी आपत्तीचे कारण बनली आहे. सौदीने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानात (एसबीपी) जमा असलेले सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे डिपॉझिट काढू नये, असे आवाहन पाकिस्तानी सरकारचे अर्थमंत्री मिफताह इस्माईल यांनी सौदी अरेबिया सरकारला केले आहे. वस्तुत: पाकिस्तानच्या विदेशी चलनाची राखीव रक्कम कमी होऊन ७८ हजार कोटी राहिली आहे. अशा वेळी पाकिस्तानला आयात बिल भरण्यासाठी विदेशी चलनसाठा राखून ठेवणे गरजेचे आहे. पाकिस्तानला जीवनावश्यक वस्तूंसाठी या चलनाची गरज आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानचा विदेशी चलनसाठा ५० हजार कोटींच्या आसपास होता. सौदीने पाकिस्तानला ही आर्थिक मदत दिली होती. मात्र, ती सहा महिन्यांसाठी होती. चीनने वचन दिल्यानंतरही पाकिस्तानला आता १९ हजार कोटींची मदत देण्यास नकार दिला आहे.

कर्जाची मुदत वाढवण्यासाठी होता शाहबाज यांचा सौदी दौरा
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ आपल्या पहिल्या सौदी दौऱ्यावर कर्जाची मुदत वाढवण्यासाठी आणि नव्या कर्जाच्या मागणीसाठी गेले होते. वस्तुत: आता अमेरिका आणि चीनकडून पािकस्तानला आर्थिक मदत मिळणे कठीण झाले आहे.

महागाईचा उच्चांक, १० किलो आटा ९०० रु., दूध १५० रुपये
पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली आहे. इथे १० िकलो आटा सुमारे ९०० रुपयांना मिळत आहे. दूध १५० रुपये लिटर इतके माहग झाले आहे. खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर १७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पाकिस्तानात मागील ७० वर्षांत महागाई विक्रमी पातळीवर आहे. या देशात महागाईचा दर १३.४ टक्के आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही खूप जास्त आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरांतही गेल्या ६ महिन्यांत सुमारे २८.६ टक्क्यांनी वाढ झली आहे. लोकांमध्ये रोष आहे.

तिकडे... इम्रान खान यांच्या पत्नीची मैत्रीण फराहवर ३३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, दुबईहून आणणार शाहबाज सरकारने माजी पंतप्रधान इम्रान खानची पत्नी बुशरा बीबींची मैत्रीण फराहला दुबईतून परत आणण्यास मंजुरी दिली आहे. फराहवर इम्रान पंतप्रधान असताना ट्रान्सफर पोस्टिंगसाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. सूत्रांनुसार फराहने ३३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. पाक सरकारने फराहचे पाकिस्तानातील बँक खाते गोठवले आहेत. इम्रान सरकारच्या विरोधात अविश्वास आणण्याच्या पुढच्या दिवशीच फराह आपल्या पतीसोबत दुबईला पळाली होती. दुबईला जाण्यासाठी विमानात बसलेल्या फराहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बातम्या आणखी आहेत...