आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सौदी अरेबियात डाळ शिजली नसल्याने पाकिस्तानने आता चीनकडे याचना करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी गुरुवारी चीन-पाकिस्तान परराष्ट्र मंत्रीस्तरीय रणनीती चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी चीनला रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी जारी एका व्हिडिआे संदेशात कुरेशी म्हणाले, हा चीनचा महत्त्वाचा दौरा आहे. या भेटीपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली. हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासमवेत होणाऱ्या चर्चेतून दोन्ही देशांना लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचे ‘डॉन’ ने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामागे परराष्ट्रमंत्री शहा महेमूद कुरेशी आहेत. त्यांनी आेआयसी व सौदीच्या विरोधात अनेक वक्तव्ये केली होती.
त्यामुळे सौदीने आता मदत देण्यास नकार दिला आहे. पाक लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी रियाधचा दौरा केल्यानंतर इमरान यांनी वक्तव्य जारी केले. दोन्ही देशांचे चांगले संबंध आहेत. आम्ही परस्परांच्या संपर्कात आहोत. वास्तविक प्रिन्स यांनी बाजवांची भेट घेणे टाळले होते. त्यांनी वेळ नसल्याचे कारण दिले होते.
तैवानचे ईमेल केले हॅक
चीन कोणत्याही शेजारी देशांसोबत कुरापती करतो. आता तैवान सरकारच्या अधिकाऱ्यांनी सहा हजारांहून जास्त ईमेल अकाउंट चीनने हॅक केल्याची तक्रार केली आहे. हॅकिंगमुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी तैवानचा दौरा केल्यापासून चीन भडकला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.