आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर:पाकला जलसाठा तोडावा लागला, 1 लाख बेघर, सिंधमध्ये सरासरीपेक्षा 464% जास्त पाऊस

कराची24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुराने बेहाल असलेल्या पाकिस्तानला सर्वात मोठ्या आणि गोड्या पाण्याच्या तलावाला तोडावे लागले. तलावातील पाण्याने धोकादायक पातळी ओलांडल्याने दक्षिणेकडील सिंधमधील ५० लाखावर लोकांवर संकट ओढावले होते. जलसाठा तोडल्यामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले आहे. एक लाख लोकांना स्थलांतरित करावे लागले आहे. त्यांची छावणीत व्यवस्था करण्यात आली आहे. सिंचन मंत्री जम खान शोरो यांच्या म्हणण्यानुसार जलसाठा तोडल्यामुळे आता या परिसरातील लोकांवरील संकट टळले आहे. पाकिस्तानात सरासरीहून तीनपट जास्त पाऊस झाला आहे. सिंध प्रांतात ४६४ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला. पाकिस्तानात पुरामुळे आतापर्यंत ४५३ मुलांसह १२९० जणांचा मृत्यू झाला. ५० लाख गरोदर महिलांना देखील छावण्यांत राहण्याची वेळ आली आहे.

बातम्या आणखी आहेत...