आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानातील पंजाब विद्यापीठात होळी खेळणाऱ्या काही हिंदू विद्यार्थ्यांवर सोमवारी हल्ला झाला. इस्लामी जमियत तुलबा (IJT) या कट्टर इस्लामी विद्यार्थी संघटनेशी संबंधितांनी हिंदू विद्यार्थांना बेदम मारहाण केली. ज्यात 15 विद्यार्थी जखमी झाले. मात्र, IJTने हल्ल्याच्या आरोपाला विरोध केला आहे. दरम्यान, या प्रकरणाशी संबंधीत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
पंजाब विद्यापीठाच्या पीयू लॉ कॉलेजमध्ये सुमारे 30 विद्यार्थी होळी खेळण्यासाठी जमले होते. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी यासाठी कॉलेज प्रशासनाची परवानगीही घेतली होती. सिंध काऊन्सिलचे सरचिटणीस काशिफ ब्रोही म्हणाले - कार्यक्रमादरम्यान अचानक आयजेटीचे लोक तेथे आले. त्यांनी भांडण सुरू केले. होळी साजरी केल्याची माहिती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे मिळवली.
कुलगुरू कार्यालयाबाहेर सुरक्षारक्षकांनी केली मारहाण
हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. याठिकाणी अनेक रक्षकांनी त्याला मारहाणही केली. त्यांनी आंदोलन करू नये म्हणून सुरक्षारक्षकांनी सुमारे 5-6 विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये कोंडले. चकमकीत जखमी झालेला विद्यार्थी खेत कुमार म्हणाला की, आम्ही कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर आयजेटी कार्यकर्त्यांच्या वागणुकीविरोधात आंदोलन करत होतो. त्यानंतर कॉलेजचे सुरक्षारक्षक तिथे आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली. आम्ही पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी पोहोचलो पण त्यांनी अद्याप गुन्हा नोंदविला नाही.
विद्यार्थ्यांना लॉन्सवर होळी खेळण्यास परवानगी नव्हती
पंजाब विद्यापीठाचे प्रवक्ते खुर्रम शहजाद म्हणाले की, प्रशासनाने विद्यार्थ्यांना कॉलेजच्या लॉनमध्ये होळी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. त्यांना आत होळी खेळण्यास सांगण्यात आले. प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगुरूंच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. त्याचवेळी, आयजेटीचे प्रवक्ते इब्राहिम शाहिद यांनी दावा केला आहे की, त्यांच्या संघटनेशी संबंधित कोणत्याही विद्यार्थ्याने हल्ला केला नाही. त्या दिवशी कॉलेजमध्ये कुराण पठणासाठी मीटिंग बोलावली होती. त्यामुळे ते विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दिसून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.