आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळामध्ये शनिवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. ही बातमी पसरताच इस्लामाबाद पोलीस विभाग हाय अलर्टवर आला आहे. पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामाबादमध्ये आधीच कलम 144 लागू करण्यात आले असून सार्वजनिक सभांवर बंदी घालण्यात आली आहे.
इस्लामाबादमधील इम्रान खान यांचे आलिशान घर असलेल्या गाला येथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बानी गाला येथे विशेष सुरक्षा तैनात केली आहे. मात्र, याठिकाणी कोण उपस्थित आहेत, याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
इम्रान खान यांना काही झाले तर तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल
इस्लामाबाद पोलिसांनुसार, ते इम्रान खान यांना संपूर्ण सुरक्षा पुरवतील आणि त्यांच्या टीमकडूनही मदतीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी यांचे म्हणणे आहे की, माजी पंतप्रधानांना काही झाले तर तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल. आम्ही याला अशाप्रकारे आक्रमकपणे प्रत्युत्तर देऊ की त्यामागे असलेल्यांना पश्चाताप होईल.
इम्रान आणि त्याच्या मंत्र्यांनीही हत्येची शक्यता व्यक्त केली आहे
इम्रान सरकारमध्ये मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी सांगितले होते की, खान रविवारी इस्लामाबादला येत आहेत. चौधरी यांनी एप्रिलमध्ये असेही म्हटले होते की, देशाच्या सुरक्षा यंत्रणेने इम्रान खानच्या हत्येचा कट रचल्याचे सांगितले होते. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे नेते फैसल वावडा यांनीही असाच दावा केला की, “देश विकण्यास” नकार दिल्याने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी त्यांची हत्या होणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. खान म्हणाले होते- माझ्या जीवाला धोका आहे. पाकिस्तानच्या आत आणि बाहेर काही लोक मला मारण्याच्या विचारात आहेत. मी त्या सर्व लोकांना ओळखतो. मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि तो सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. जर मला मारले गेले तर या व्हिडिओतून या सर्व लोकांची नावे समोर येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.