आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात राजकीय खेळखंडोबा:इम्रान खान यांची खुर्ची जाताच बुशरा बीबीची मैत्रीण फराह यांनी सोडलं पाकिस्तान, भष्ट्राचाराचे आहेत आरोप

इस्लामाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात सध्या राजकीय नाट्य सुरू आहे. पाकिस्तान संसद बरखास्त केल्यानंतर औपचारिकपणे इम्रान खान हे सध्या पंतप्रधान नाहीत. मात्र, ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आणखी काही दिवस काम करू शकतात. या काळात त्यांना कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकार राहणार नाही. सध्या इम्रान खान यांच्या गोटात खळबळ माजली आहे.

इम्रान खान यांच्या पक्षातील आणि त्याच्या कुटुंबातील जवळचे लोक देश सोडून पळून जात आहेत. यात सर्वांत मोठे नाव हे इम्रान खान यांच्या बेगम बुशरा बीबी यांची खास मैत्रीण फराह खानचे आहे. फराह खान यांच्यावर इम्रान आणि बुशराच्या मदतीने पाकिस्तानात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी आणि विरोधी पक्षनेत्या मरियम नवाज यांनी हे आरोप केले आहेत. बिलावल भुट्टो यांनीही फराह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

फराह खान या इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची खास मैत्रिण आहे. विरोधकांनी त्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत.
फराह खान या इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांची खास मैत्रिण आहे. विरोधकांनी त्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले आहेत.

याच मैत्रिणीच्या घरी थांबल्या होत्या बुशरा -
इम्रान खान यांच्या कुटुंबात फराहचा हस्तक्षेप किती आहे, याचा अंदाज यावरून लावता येतो की, बुशरा आणि इम्रान यांच्यात भांडण झाले होते, तेव्हा त्या रागाच्या भरात फराह खान यांच्या घरी थांबल्या होत्या. काही दिवसानंतर पुन्हा बुशरा घरी परतल्या होत्या.

फराह खानला पीटीआयचे समर्थन -
भष्ट्राचाराच्या आरोपानंतर फराह खान यांना इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)ने पाठिंबा दर्शवला होता. पक्षाचे नेते शाहबाज गिल यांनी फराहला पाठिंबा देत उलट मरियम नवाजवर छळ केल्याचा आरोप केला होता. फराह यांचा पीटीआयशी काही संबंध नाही. तसेच त्यांचे जीवन हे सार्वजनिक नाही. मरियमकडे दुसरा कोणताही मुद्दा उरला नाही, त्यामुळे बुशरा यांच्या मैत्रिणीवर आरोप करत आहे, असे शाहबाज म्हणाले होते.

इम्रान खान यांच्यासोबत भांडन झाल्यावर बुशरा फराह खान यांच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या.
इम्रान खान यांच्यासोबत भांडन झाल्यावर बुशरा फराह खान यांच्या घरी राहण्यासाठी गेल्या होत्या.

तुरुंगात जाण्याच्या भीतीने पलायन -
पाकिस्तानात सत्ता हाती आल्यावर विरोधीपक्षांना तुरुंगात टाकण्याची जुनीच प्रथा आहे. म्हणून तुरुंगात जाण्याच्या भीतीने इम्रान खान सत्तेत आल्यानंतर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे लंडनला पळून गेले. तसेच त्यापूर्वी नवाज सत्तेवर आल्यावर परवेझ मुशर्रफ यांना पाकिस्तान सोडावे लागले होते. त्यामुळेच इम्रानची सत्ता गेल्याचे पाहून त्यांच्या पक्षातील नेते आणि जवळचे लोक पाकिस्तान सोडून जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...