आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan In The Direction Of Suicide, Will Be Divided Into Three Parts: Imran Khan; He Also Demanded That The Army Intervene To Improve The Situation

वक्तव्यावर वादंग:पाकिस्तान आत्मघाताच्या दिशेने, तीन तुकडे होतील : इम्रान खान; स्थिती सुधारण्यासाठी लष्कराने हस्तक्षेप करण्याची मागणीही

पाकिस्तानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत केलेल्या सनसनाटी वक्तव्यामुळे पुन्हा वादंग निर्माण झाले आहे. पाकिस्तानची वाटचाल आत्मघाताकडे सुरू झाली आहे. त्यात सुधारणा झाली नाहीतर पाकिस्तानचे तीन तुकडे (सिंधू, पंजाब, बलुचिस्तान) होतील, असा दावा इम्रान यांनी केला. इम्रान म्हणाले, लवकर कारवाई केली नाहीतर सर्वात आधी पाक सैन्याची हानी होईल. लष्कर कमकुवत झाल्यास आण्विक शस्त्रांचे संरक्षण करण्यात लष्कराला यश मिळणार नाही. पाकिस्तानच्या तिजोरीत खडखडाट आहे. पाकिस्तानचे कधी तुकडे होतात ? याच संधीची ते (भारत व अमेरिका) याच प्रतीक्षा करत आहेत. नवीन निवडणुकीची तारीख जाहीर होते तोपर्यंत आमचा पक्ष आंदोलन करत राहणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते ट्वीट करून म्हणाले, इम्रान यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांची वक्तव्ये पाहिल्यास त्यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती हे दिसते. इम्रान यांनी भलेही राजकारण करावे. परंतु देशाच्या विरोधात बोलू नये. पीपीपी प्रमुख आसिफ अली झरदारी म्हणाले, देशाचे नुकसान व्हावे असे वाटणाऱ्या इम्रान यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी. पाकिस्तान कयामतपर्यंत कायम राहील.

माजी पीएम झरदारी म्हणाले, इम्रान यांच्या तोंडी भारताची भाषा
पाकिस्तानच्या प्रमुख संस्था (लष्कर, न्यायसंस्था) मौन धरून करून आहेत. अफगाण, सिरियासारखी स्थिती होणार आहे. -इम्रान खान, माजी पंतप्रधान

मी सध्या तुर्कीत आहे. देशासाठी करार करत आहे. इम्रान यांनी चुकीची वक्तव्ये करून देशाला कमकुवत करत आहे. हे योग्य नाही. -शाहबाज शरीफ, पंतप्रधान.

इम्रान पाकचे तुकडे होतील असे म्हणतात. ही एखाद्या पाकिस्तानीची नव्हे मोदींसारखी भाषा आहे.-आसिफ अली झरदारी, पीपीपी प्रमुख

ऑडिओ : अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यासाठी केली होती झरदारींशी चर्चा
एका ऑडिअोमुळे पाकच्या राजकारणात गदारोळ झाला. इम्रान यांचे सरकार अविश्वास प्रस्तावाला ताेंड देताना प्रसिद्ध उद्योजक मलिक रियाज यांनी इम्रान यांच्याकडून पीपीपीप्रमुख आसिफ अली झरदारींशी चर्चा केली होती. त्यात रियाझ यांनी इम्रानकडून सौदेबाजीची ऑफर दिली होती.

सरकारला आव्हान देण्यात असमर्थ ठरल्याने इम्रान निराश
सुरक्षातज्ज्ञ महमूद शाह ‘भास्कर’ला म्हणाले, इम्रान खान यांची वक्तव्ये त्यांना आलेले नैराश्य दाखवणारे आहे. इम्रान यांनी अनेक प्रकारची आंदोलने केली. परंतु त्यांना सरकारसमोर आव्हान उभे करता आलेले नाही. इम्रान खान शक्तिशाली लष्कराच्या उपकारातून सत्तेवर आले होते. आता ते स्वत:ला शोधून काढावे लागतील. आता ते एकटे पडल्याने लष्कराला एकत्र येण्यासाठी उचकवू लागले आहेत.

शरीफ सरकारची इम्रान खान यांच्याविरोधात आघाडी
शरीफ सरकारने इम्रान खानच्या विरोधात आघाडी सुरू केली आहे. सरकारमधील घटक पक्ष पीडीएमचे प्रवक्ते हाफिज हमदुल्ला म्हणाले, सत्ता मिळवण्यासाठी इम्रान अशी वक्तव्ये करत आहेत, हे योग्य नाही. पीएमएलएनच्या मरियम नवाज म्हणाल्या, सत्ता गमावल्यापासून इम्रान यांचे मानसिक संतुलन ढळलेले दिसते. पाक जनता लवकरच त्यांना धडा शिकवेल. पाकिस्तान कायम राहील.

बातम्या आणखी आहेत...