आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या नावाखाली सुरू असलेली हत्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. पाकिस्तानातील डेरा इस्माईल खानमध्ये मंगळवारी तीन महिला शिक्षकांनी ईशनिंदा केल्याचा आरोपात आपल्या एका सहकारी शिक्षिकेची गळा चिरून हत्या केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मृत महिलेवर स्वप्नाच्या आधारे ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'ने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जामिया इस्लामिया फलाहुल बिनतमध्ये घडली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पीडितेचा मृतदेह रक्ताने माखलेला आणि गळा चिरलेला आढळला. यानंतर सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
13 वर्षाच्या मुलीने स्वप्न पाहिले होते
एका 13 वर्षांच्या मुलीला काल रात्री एक स्वप्न पडले, ज्यामध्ये तिला मृत व्यक्तीने केलेल्या निंदेबद्दल कळले आणि तिला त्या महिलेला मारण्याचा आदेश देण्यात आला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. हे स्वप्न तिने नातेवाइकाला सांगितल्यावर तिने इतर शिक्षकासह आपल्या सहकारी शिक्षिकेची हत्या केली.
पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, मृत महिला धार्मिक नेता मौलाना तारिक जमीलचा अनुयायी होती, जे आरोपींना पसंत नव्हते. आरोपी महिला दक्षिण वझिरीस्तान आदिवासी जिल्ह्यात राहणाऱ्या मेहसूद जमातीच्या आहेत.
दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
या घटनेनंतर, वफाकुल मदारिस अल अरब पाकिस्तान, मदरशांच्या मंडळाने या हत्येचा निषेध केला आणि हे "दुर्दैवी" असल्याचे म्हटले. बोर्डाने निवेदन जारी करून या घटनेचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
गेल्या वर्षी श्रीलंकेच्या मॅनेजरला जिवंत जाळण्यात आले होते
गेल्या वर्षीही पाकिस्तानातील सियालकोटमध्ये श्रीलंकन वंशाच्या फॅक्टरी मॅनेजरला ईशनिंदेच्या आरोपाखाली सार्वजनिकरित्या जिवंत जाळण्यात आले होते. प्रियंता कुमारा नावाच्या या व्यक्तीच्या केबिनमध्ये एक फाटलेले पोस्टर सापडले, ज्यावर मोहम्मद असे लिहिले होते. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांनी हा पैगंबराचा अपमान मानला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.