आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Pakistan | Indian High Commission In Pakistan Islamabad Latest News Updates: Two Staffers Of Indian High Commission Arrested In Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:भारतीय दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना अटक : भारत पाकिस्तानला म्हणाला - अधिकाऱ्यांची चौकशी होऊ नये, त्यांना गाडीसह ताबडतोब दूतावासात पाठवा

नवी दिल्ली/इस्लामाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकाऱ्यांना हिट अॅण्ड रन च्या आरोपाखाली अटक केल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा

इस्लामाबादमध्ये भारतीय हायकमीशनच्या दोन बेपत्ता अधिकाऱ्यांच्या इस्लामाबादमधील अटकेच्या अहवालावर भारताने पाकिस्तानला कडक सूचना दिल्या आहेत. भारताने पाकिस्तानी हायकमीशनला समन्स पाठवला आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नये, त्यांची कोणत्याही प्रकारे चौकशी केली जाऊ नये, असे निषेध पत्रात भारताने पाकिस्तानला सांगितले आहे.

अटक करण्यात आलेल्या अधिका्यांना तातडीने त्यांच्या कारसह भारतीय दूतावासात पाठवावे, असेही भारताने म्हटले. या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानवर आहे.

अधिकारी बेपत्ता झाल्याची सकाळी बातमी आली होती

सोमवारी सकाळी 8.30च्या सुमारास इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचे दोन अधिकारी बेपत्ता असल्याची बातमी आली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला या दोन्ही अधिकाऱ्यांचा तत्काळ शोध घेण्यास सांगितले होते. संध्याकाळा या दोन्ही अधिकाऱ्यांना हिट अॅण्ड रन प्रकरणात इस्लामाबादमध्ये अटक करण्याची बातमी आली. इस्लामाबाद पोलिसांच्या सुत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या कारने एका प्रवाशाला धडक दिली, त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

आयएसआय एजंटने भारतीय दुतावास अधिकाऱ्याचा पाठलाग केला होता

काही दिवसांपूर्वी आयएसआय एजंट्सने भारतीय दुतावास अधिकारी गौरव अहलूवालियाच्या कारचा पाठलाग केला होता. याचा व्हिडिओ देखील समोर आला होता. अहलूवालिया यांच्या घरासमोर देखील आयएसआयचे काही एजंटनेट तैनात केले होते. त्याविरूद्ध भारताने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाविरोधात निषेध नोंदविला होता.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला एक मुत्सद्दी नोट देखील दिली होती. यामध्ये म्हटले होते की, मार्चपासून आतापर्यंत भारतीय दुतावास अधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या किंवा पाठलाग करण्याच्या 13 घटना समोर आल्या आहेत. पाकिस्तानमध्ये अशी कृती त्वरित थांबली पाहिजे, अशी चेतावनी देखील भारताने दिली होती.

पाकिस्तानी गुप्तचरांना अटक केली होती 

दिल्ली पोलिसांनी 1 जून रोजी पाकिस्तानी दूतावासच्या दोन अधिकाऱ्यांना हेरगिरी करताना रंगे हात पकडले होते. हे लोक एका व्यक्तीला पैशांची लालूच देऊन सुरक्षा संबंधित कागदपत्रे घेत होते. दोन्ही गुप्तचर दूतावासमध्ये व्हिसा असिस्टंट म्हणून काम करत होते. पकडल्यानंतर त्यांनी स्वतःला भारतीय नागिरक असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याकडे खोटे आधार कार्ड, भारतीय चलन आणि आयफोन सापडले होते. भारताने या दोन्ही अधिकाऱ्यांना 24 तासांत देश सोडण्यास सांगितले होते. त्यादरम्यान ते भारतातून निघून गेले. 

बातम्या आणखी आहेत...