आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी:पाकिस्तान लसीसाठी गरीब रांगेत, श्रीमंतांची मात्र चलती

सलमा मसूद | इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीची कमतरता, खासगी रुग्णालयांना विक्री सवलतीचा संताप

पाकिस्तानात सध्या कोरोना लसींचा तुटवडा आहे. तेथे चीनची कंपनी सिनोफार्मा आणि रशिया त्यांची स्पुटनिक- व्ही लस पाठवत आहे. मात्र, त्या टोचून घेण्यासाठीही कराची, लाहोरसह प्रत्येक शहरात मोठ्या रांगा आहेत. विशेष म्हणजे अनेक तास रांगेत लागूनही लोकांना लस भेटत नाहीये.

इम्रान सरकारकडे लसी कमी आहेत. खासगी रुग्णालयातही तुटवडा आहे. लस घेण्यासाठी लोक लाच द्यायलाही तयार आहेत. मे महिन्यात १८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस घेण्याच्या आरोपात निलंबित करण्यात आले. लोकांचे म्हणणे आहे की, खासगी रुग्णालयात श्रीमंतांसाठी लसीचा कोणताही तुटवडा नाही. तर सरकारचे म्हणणे आहे की, पुरवठा कमी असल्याने लसीकरणाचा वेग हळू आहे.

यात पाकिस्तानातील मध्यमवर्गीय लोक सर्वाधिक त्रस्त आहेत. ते खर्च करायला तयार आहेत, मात्र तरीही त्यांना लस उपलब्ध नाही. मोहंमद नासिर चौधरी (३५) सांगतात, मी स्पुटनिकसाठी खासगी रुग्णालयात ८० डॉलर (सुमारे ५८०० रुपये) द्यायला तयार आहे. तरीही माझा क्रमांक कधी येईल हे माहित नाही.

मात्र जे लोक पैसे देऊ शकत नाहीत त्यांच्यात सरकारविरोधात संताप आहे. इस्लामाबादचे वकिल जुनैद जहांगिर सांगतात, माझ्या अनेक श्रीमंत मित्रांनी खासगी लस घेतली. मीदेखील नोंदणी केली होती. मात्र लसीकरण थांबवल्याचा मेसेज आला. अशात मी बाधित झाला तर याला जबाबदार काेण असेल? याच प्रमाणे इस्लामाबाद परिसरात पती व सात वर्षाच्या मुलासोबत राहणारी तहमीना सदफ सांगते, आमचे महिन्याचे उत्पन्न सुमारे १० हजार रुपये आहे. घराचे भाडे आणि वीज बिल दिल्यानंतर आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की लस विकत घेता येईल. आम्हाला तर सरकारी केंद्रावर क्रमांक येण्याची वाट पहावी लागेल. तर माहिती मंत्री चौधरी फवाद हुसेन सांगतात की, स्पुटनिक आणि सिनोफार्म शिवाय पाकिस्तानला लवकरच अॅस्ट्राजेनेकाच्या लसीचे १३ लाख डोस भेटतील. मे अखेरपर्यंत सिनोवॅक लसीचे ३५ लाख अतिरिक्त डोस उपलब्ध होतील.

स्पुटनिकची मागणी जास्त, दुसरा स्वस्त पर्यायही उपलब्ध

स्पुटनिकव्यतिरिक्त इम्रान सरकारने अनेक अाणखी लसींच्या विक्रीची परवानगी दिली अाहे.चीनच्या कॅनन्सिनाे बायाॅलाॅजिक्सचा सिंगल डाेस लस २८ डाॅलर म्हणजे २ हजार रुपयात उपलब्ध अाहे. गेल्या महिन्यातच त्याच्या विक्रीची परवानगी मिळाली अाहे.परंतु स्पुतनिकवर जास्त विश्वास असल्याने त्याची मागणी जास्त अाहे.

खासगी विक्रीच्या निर्णयावरून वाद
लसी तुटवड्यासाठी सरकारच्या खासगी विक्रीचा निर्णय जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत अाहे. पाकिस्तान मेडिकल असाेसिएशनचे नेते डाॅ. मिर्जा अली अजहर म्हणाले, गरीब लस कसे खरेदी करतील याचा सरकारने विचार केला नाही. यामुळे गरीबांमध्ये संताप वाढेल. पण खासगी रुग्णालयात लस माेफत अाहे. श्रीमंत खर्च करण्यास सक्षम असल्याने त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केल्याचे सरकारचे म्हणणे अाहे.

बातम्या आणखी आहेत...