आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमानाच्या ढिगारात खजिना:पाकमध्ये क्रॅश झालेल्या विमानाच्या ढिगारातून सापडले 3 कोटी रुपयांच्या बॅगा, विमानतळावरून रक्कम पकडली कशी नाही? तपास सुरू

कराचीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातग्रस्त विमानात सापडले 3 कोटी रुपये? विमानतळावरील स्कनिंगमधून कसे सुटले

पाकिस्तानात 22 मे रोजी झालेल्या विमान अपघातातून एक अजब माहिती समोर आली आहे. विमानाचा ढिगारा उचलताना त्यातून कॅशने भरलेल्या दोन बॅगा सापडलेल्या आहेत. यामध्ये जवळपास 3 कोटी रुपयांच्या चलनी नोटा असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, एवढी मोठी रक्कम विमानात घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला विमानतळावरील स्कॅनिंग आणि तपासातून सोडलेच कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचा ढिगारा उचलल्यांनंतर प्रवाशांच्या बॅगांचा शोध घेण्यात आला. त्याचवेळी ही रक्कम सापडली. आता या घटनेचा तपास केला जात आहे.

विमान अपघातात 9 चिमुकल्यांसह 97 जणांचा मृत्यू

22 मे रोजी लाहोर येथून कराचीला जाणारे विमान लँडिंग करण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी कोसळले. विमानातील क्रू मेंबर्ससह यात 99 जण प्रवास करत होते. यातील केवळ 2 जण वाचले आहेत. मृतांमध्ये 9 चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. हा अपघात कराची आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झाला होता.

वैमानिकाने एटीसीच्या इशाऱ्यावर दुर्लक्ष केले

एकीकडे पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातासाठी वैमानिकाला कारणीभूत ठरवले जात आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ने पायलटला तीन वेळा वॉर्निंग दिल्या होत्या. तरीही वैमानिकाने त्यावर दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे, पाकिस्तानच्या वैमानिक संघटनेने या विमान अपघाताच्या चौकशीसाठी बनवलेल्या तपास समितीवरच शंका उपस्थित केली. ज्या विमानाचा अपघात झाला ते एक कमर्शिअल प्लेन होते तरीही तपास समितीमध्ये एकही कमर्शिअल पायलटला ठेवण्यात आले नाही असा आरोप या संघटनेने केला.

बातम्या आणखी आहेत...