आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानने शुक्रवारी दहशतवादाविरोधात ऑपरेशन ऑलआऊट सुरू करण्याची घोषणा केली. या कारवाईत बंदी घालण्यात आलेल्या संघटनांवर बेधडक कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जिओ न्यूजनुसार, या बैठकीला लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, जनरल शमशाद मिर्झा, केंद्रीय संरक्षण आणि अर्थमंत्र्यांसह पाकिस्तानचे सर्वोच्च नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते.
नव्या जोमाने आणि निर्धाराने होणार ही कारवाई
या कारवाईच्या माध्यमातून पाकिस्तानमधून दहशतवादाचा नायनाट केला जाईल. त्यासाठी लष्करी वापराशिवाय राजकीय, राजनैतिक, आर्थिक आणि सामाजिक प्रयत्नही केले जातील. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही कारवाई नव्या जोमाने आणि निर्धाराने सुरू केली जाईल. यात सरकारसोबत जनतेलाही सोबत घेतले जाणार आहे.
3 महिन्यांत 127 पोलिसांना गमवावा लागला जीव
पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वामध्ये गेल्या 3 महिन्यांत दहशतवादी हल्ल्यात 127 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात 116, फेब्रुवारीमध्ये 2 आणि मार्चमध्ये 9 पोलिसांचा मृत्यू झाला. जानेवारीमध्ये पेशावर पोलिस लाइन्समधील मशिदीवर झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 96 जवान शहीद झाले होते. 2022 मध्ये दहशतवादी हल्ल्यात 120 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला होता.
TTPशी चर्चा थांबली अन् हल्ल्यात वाढ
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद वाढला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तान सरकारची तहरीक-ए-तालिबानशी (टीटीपी) चर्चा तुटली. यानंतर टीटीपीने हल्ले तीव्र केले. त्याने खास खैबर-पख्तूनख्वामधील पोलिसांवर निशाणा साधला. खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये परिस्थिती सर्वात जास्त बिघडली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.