आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात मॉब लिंचिंग:पवित्र कुराणचा अपमान केल्याचा आरोप करत झाडाला लटकावले, पोलिस कोठडीत दगडाने ठेचून केले ठार

पाकिस्तान6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात पवित्र कुराणचा अपमान केल्याप्रकरणी जमावाने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जमावाने त्या व्यक्तीला झाडाला लटकवले आणि त्याच्यावर दगडफेक सुरू केली. यादरम्यान तो स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा करणाऱ्या लोकांकडून मदत मागत राहिला, पण कोणीही त्याचे एकूण घेतले नाही. तो मरेपर्यंत त्याच्यावर दगडफेक करण्यात आली.

कुराणची पाने फाडून लावली आग
हे प्रकरण पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील खानवाल जिल्ह्यातील एका गावातील आहे. येथे नमाजासाठी लोक जमले होते, तेव्हा एका व्यक्तीने कुराणची काही पाने फाडली आणि त्यांना आग लावली. यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी त्या व्यक्तीवर हल्ला केला.

पोलीस कोठडीत केली हत्या
कुराणचा अपमान केल्याचा राग आलेल्या लोकांनी आधी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली, नंतर झाडाला लटकवले. घटनास्थळी जमलेल्या जमावाने आरोपींवर दगडफेक सुरू केली. घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी सांगितले की, दगडफेक होण्यापूर्वीच पोलिस तेथे पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले, मात्र जमावाने त्याला पोलिस ठाण्यातच पकडले.

मुख्यमंत्र्यांनी मागवला अहवाल
या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर टीकेची झोड उठली आहे. प्रांत सरकारने यावर कारवाई केली आहे. मुख्यमंत्री उस्मान बजदार यांनी IGP राव सरदार अली खान यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

पाकिस्तानात धर्माच्या नावाखाली मॉब लिंचिंग सामान्य?
एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये धार्मिक अपमानाच्या नावाखाली मॉब लिंचिंग सामान्य आहे. 1947 मध्ये फाळणी झाल्यापासून पाकिस्तानमध्ये कोणत्याही धर्माचा अपमान केल्याप्रकरणी एकूण 1,415 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. थिंक टँकच्या अहवालानुसार, 1947 ते 2021 या काळात 18 महिला आणि 71 पुरुषांची धर्म किंवा धर्मग्रंथाचा अपमान केल्याबद्दल हत्या करण्यात आली. थिंक टँकचे म्हणणे आहे की हा अधिकृत डेटा आहे, तर खरी संख्या जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...