आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:62 वर्षीय खासदाराने केले 14 वर्षीय मुलीशी लग्न, एनजीओच्या अपीलनंतर पोलिसांनी सुरू केली चौकशी

इस्लामाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलीचे बर्थ सर्टिफिकेट आले समोर

पाकिस्तानमधून एक चकीत करणारी बातमी समोर आली आहे. येथील जमीयत उलेमा-ए-इस्लाम (JUI-F) च्या बलूचिस्तानचे खासदार मौलाना सलाहउद्दीन अयूबी ( वय 62) ने एका 14 वर्षीय मुलीशी लग्न केले आहे. प्रकरण थोडे जुने आहे. सुरुवातीला हे प्रकरण चर्चेतही आले होते, पण याची पुष्टी झाली नव्हती. आता एका NGO च्या अपीलवर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मुलीच्या वडिलांनीही या लग्नाची पुष्टी केली आहे. पाकिस्तानात मुलीच्या लग्नाचे वय 16 आहे. यापेक्षा कमी वयाच्या मुलीचे लग्न केल्यास कायद्याने गुन्हा ठरतो.

मुलीचे बर्थ सर्टिफिकेट आले समोर

मौलान अयूबी बलूचिस्तानातील चित्रालचे खासदार आहेत. त्यांनी अद्याप या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली नाही. ते मौलाना फजल-उर-रहमान पक्षाचे खासदार आहेत. रहमान सध्या पाकिस्तान डेमोक्रेटिक फ्रंट (PDM) चे नेते आहेत. हे फ्रंट इम्रान सरकारविरोधात देशात आंदोलन करत आहे.

‘द डॉन’च्या एका रिपोर्टनुसार, मुलीच्या शाळेने तिचे बर्थ सर्टिफिकेट मीडियात दिले आहे. यात तिची जन्म तारीख 28 ऑक्टोबर 2006 सांगितलीजात आहे. यानंतर एका लोकल NGO ने पोलिसात तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...