आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Pakistan Minister Marriyum Aurangzeb, Protest Video Footage, London News, Maryam Aurangzeb Was Insulted, Latest News And Update 

लंडनमध्ये पाकच्या मंत्र्यांचा निषेध:मरियम औरंगजेब यांच्यावर लंडनस्थित पाकिस्तानी संतप्त; 'चोर-चोर' म्हणत हिनवले

लंडन/इस्लामाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांना लंडनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुळात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबत एक शिष्टमंडळ लंडनला गेलेले आहे. त्या शिष्टमंडळात माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांचाही समावेश आहे. दरम्यान, त्या एका शानदार कॉफी शॉपमध्ये गेल्या होत्या. तेव्हा त्या कॉपी शॉपमध्ये मुळ पाकिस्तानी असलेल्या पण लंडनमध्ये राहणाऱ्या लोकांनी तिच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. विरोधात घोषणाबाजी सुरू असताना मंत्री मरियम औरंगजेब यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या ठिकाणाहून बाहेर पडल्या.

पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना कॉपी शॉपमध्ये नागरिकांनी घेराव घातला.
पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना कॉपी शॉपमध्ये नागरिकांनी घेराव घातला.

मरियम यांनी मरियम यांना घेराव घातला
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मरियम कॉफी शॉपीमध्ये कॉपी घेत असताना दिसत आहे. तेव्हा लोकांनी तिला घेराव घातला. दरम्यान, काही लोक चोर-चोर अशा घोषणा देऊन आरडाओरड करू लागतात. पाकिस्तानातील वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, निदर्शक पाकिस्तानमधील पुरामुळे झालेल्या विनाशाच्या दरम्यान पाकिस्तान सरकारच्या नेत्यांच्या परदेश दौऱ्याचा निषेध करत होते.

घोषणाबाजी मागे इम्रान यांचा हात असल्याचा केला आरोप
पाकिस्तानी पत्रकार सय्यद तलत हुसैन यांनी या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यानंतर मरियम औरंगजेब यांनी या आंदोलनामागे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा हात असल्याचे सांगितले आहे. त्या म्हणाल्या की, इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयचे समर्थक असलेल्या लोकांनी मला हिनवले आहे. त्या लोकांनी मी काहीही बोलू इच्छित नाही. इम्रान खान यांनी पाकिस्तानी समाज उद्ध्वस्त केला आहे. इम्रान खान यांच्या द्वेष आणि विभाजनाच्या राजकारणामुळे मी निराश झाले. या राजकारणामुळे परदेशात राहणारे पाकिस्तानी भडकत आहेत. मात्र जनतेला एकत्र करण्याचे काम आम्ही करत राहणार आहोत.

पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी ट्विट करून निदर्शनांमागे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा हात असल्याचे सांगितले.
पाकिस्तानच्या माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी ट्विट करून निदर्शनांमागे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा हात असल्याचे सांगितले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे PML-N पक्षाचे प्रमुख तथा त्यांचे भाऊ नवाज शरीफ यांची भेट घेण्यासाठी लंडनमध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळही होते. नवाज यांच्याशी संवाद साधल्यानंतर शाहबाज शरीफ हे सरकार संबंधित अनेक निर्णय घेतात. दरम्यान, पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांच्याजागी आता इशाक दार यांना नवे अर्थमंत्री बनवण्यात आले आहे. हा निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. इतकंच नाही तर नोव्हेंबरमध्ये नवा लष्करप्रमुख कोण असेल याचा निर्णयही पीएमएल-एन पक्षाचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांच्याशी बोलून घेतला जाणार आहे.

हे छायाचित्र लंडनमधील बैठकीचे आहे. यात PM शाहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये मिफ्ताह इस्माईल (राजीनामा देणारे मंत्री) उभे आहेत. माहिती मंत्री मरियम औरंगजेब डावीकडून पहिल्या क्रमांकावर दिसून येत आहे.
हे छायाचित्र लंडनमधील बैठकीचे आहे. यात PM शाहबाज शरीफ आणि नवाज शरीफ यांच्यामध्ये मिफ्ताह इस्माईल (राजीनामा देणारे मंत्री) उभे आहेत. माहिती मंत्री मरियम औरंगजेब डावीकडून पहिल्या क्रमांकावर दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या PM यांना सौदीत विरोध
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एप्रिलमध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला होता. यादरम्यान ते मदिना येथील मस्जिद-ए-नबवी येथे गेले. यावेळी उपस्थित पाकिस्तानी लोकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. काही लोकांनी तेव्हा देखील चोर चोर असे संबोधून त्यांना हिनवले होते.

बातम्या आणखी आहेत...