आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी खासदाराचा दावा:परराष्ट्र मंत्री म्हणाले होते - 'रात्री 9 वाजेपर्यंत विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली नाही तर भारत हल्ला करेल, भीतीने थरथरत होते आर्मी चीफचे पाय'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विंग कमांडर अभिनंदन 1 मार्चला वाघा बॉर्डरवरुन देशात परतले होते

पाकिस्तानच्या एका खासदाराने बुधवारी पाकिस्तानच्या संसदेत दावा केला की, भारताच्या हल्ल्याच्या भितीने इम्रान खान सरकारने भारतीय हवाई दलाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली होती. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी एअरफोर्समध्ये झालेल्या हवाई हल्ल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते.

नॅशनल असेंबलीमध्ये बुधवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (PML-N) नेता अयाज सादिक यांनी म्हटले की, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये म्हटले होते की, जर आपण विंग कमांडर अभिनंदन यांना सोडले नाही तर भारत रात्री 9 वाजेपर्यंत हल्ला करेल. पाकिस्तानच्या दुनिया न्यूजने खासदार सादिक यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

'मीटिंगदरम्यान आर्मी चीफचे पाय थरथरत होते'
PML-N नेत्याने विरोधीपक्षातील नेत्यांना सांगितले की, या मुद्द्याविषयी कुरैशी यांनी PPP, PML-N आणि सैन्य प्रमुख जनरल कमर जावेद बाजवांसह इतर नेत्यांसोबत बैठक घेतली होती. सादिक म्हणाले की, 'मला आठवते मीटिंगदरम्यान आर्मी चीफ बाजवा खोलीमध्ये आले. त्यावेळी त्यांचे पाय थरथरत होते आणि त्यांना घाम फुटला होता'

सादिक यांनी सांगितले - या मीटिंगमध्ये सहभागी होण्यास इम्रान खान यांनी नकार दिला होता. परराष्ट्र मंत्र्यांनी मीटिंगमध्ये आर्मी चीफला म्हटले होते - अल्लाहसाठी अभिनंदन यांची सुटका करा, अन्यथा भारत रात्री 9 वाजेपर्यंत हल्ला करेल. दुनिया न्यूजने खासदार सादिकच्या हवाल्याने म्हटले की, विरोधीपक्षाने अभिनंदनसह सर्व मुद्द्यामध्ये सराकरेच समर्थन केले आहे, मात्र पुढे समर्थन करु शकणार नाही.

विंग कमांडर अभिनंदन 1 मार्चला वाघा बॉर्डरवरुन देशात परतले होते
फेब्रुवारी 2019 मध्ये पाकिस्तानी लढाई विमानांनी भारतीय हवाई सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान मिग-21 वर असलेले विंग कमांडर वर्धमान यांनी पाकिस्तानच्या F-16 एअरक्राफ्ट पाडले होते. यामध्ये त्यांचे विमान पाकिस्तानात जाऊन पडले. यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांना 1 मार्टला अटारी-वाघा बॉर्डरवरुन भारतात परतले होते.