आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान:बळजबरी धर्मांतराविरोधात सिंधमध्ये हिंदुंचे प्रदर्शन; दरवर्षी एक हजारांपेक्षा जास्त हिंदू मुलींचे अपहरण करुन मुस्लिमांसोबत लग्न करण्याचा आरोप

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील सिंधी फाउंडेशननुसार, सिंधमध्ये दरवर्षी अंदाजे 1000 हिंदू मुलींचे अपहरण होते

पाकिस्तानातील सिंध प्रांतात बळजबरीने धर्मांतर करण्याविरोधात हिंदुंनी विरोध प्रदर्शन केले. हिंदुंचा आरोप आहे की, तबलीगी जमात त्यांना धर्म बदलण्यास सांगतात आणि नकार दिल्यावर त्यांच्यावर अत्याचार केले जातात. येथील लोकांचा आरोप आहे की, जमातच्या लोकांनी धर्म परिवर्तनास नकार दिल्यामुळे एका तरुणाचे अपहरण केले.

दोन व्हिडिओ व्हायरल

सिंध प्रांतातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडिओत भील हिंदू बळजबरी धर्मांतराविरोधात प्रदर्शन करताना दिसत आहेत. मटियारच्या नसूरपूरमध्ये महिला आणि मुले हातात पाट्या पकडून आहेत. हे लोक तबलीगी जमातविरोधात आंदोलन करत लिहीत म्हणत आहेत की ‘‘आम्ही एकवेळ मरणे पसंत करू, पण इस्लाम कधीच कबुल करणार नाहीत.’’प्रदर्शनातील एक महिला म्हटले की, आमची संपत्ती घेण्यात आले, घरदेखील तोडले. महिलेने आरोप लावले आहेत की, घर परत मिळवण्यासाठी जमातच्या लोकांनी इस्लाम कबुल करण्यास सांगितले आहे.   दुसऱ्या एका व्हिडिओत महिला रडत आहे. ती म्हणाली की, जमातच्या लोकांनी माझ्या मुलाचे अपहरण केले. मी माझ्या मुलाच्या सुटकेसाठी भीक मागते.

सिंधमध्ये दरवर्षी अंदाजे 1 हजार हिंदू मुलींचे अपहरण होते

पाकिस्तानमधून अनेकदा धर्म परिवर्तनाचे प्रकरणे समोर आले आहेत. काही दिवसांपासून ही प्रकरणे वाढत आहेत. अमेरिकेतील सिंधी फाउंडेशनने सांगितल्यानुसार, सिंध प्रांतात दरवर्षी अंदाजे एक हजार मुलींचे अपहरण करुन, त्यांचे धर्म परिवर्तन केले जाते. त्यानंतर त्यांचे मुस्लिम तरुणांसोबत लग्न केले जाते.

बातम्या आणखी आहेत...