आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई हल्यातील मास्टर माइंडवर मोठी कारवाई:हाफिज सईदला अजून एका गुन्ह्यात 15 वर्षांचा तुरुंगवास; 5 प्रकरणात आतापर्यंत 36 वर्षांची शिक्षा

लाहोर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाफिज सईद जुलै 2019 पासून तुरुंगात आहे

मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्याचा मास्टर माइंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानातील एका न्यायालयाने 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगप्रकरणात न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. या शिक्षेसह त्याच्यावर दोन लाख रुपचांदा दंडही ठोठावण्यात आला आहे.

70 वर्षीय सईदला यापूर्वी अशाच प्रकारच्या चार प्रकरणात 21 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 5 प्रकरणात आतापर्यंत सईदला 36 वर्षांची शिक्षा मिळाली आहे. सईद सध्या लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात बंद आहे.

जुलै 2019 पासून तुरुंगात

सईदला मागच्या वर्षी 17 जुलैला अटक करण्यात आली होती, तेव्हापासून तो तुरुंगात कैद आहे. फेब्रुवारीमध्ये टेरर फंडिंगप्रकरणी कोर्टाने त्याला 11 वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर अजून दोन प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सईदविरोधात टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग आणि अवैध कब्जा मिळवण्यासह 23 गुन्हे दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...