आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकचा तिळपापड:राम मंदिरावर पाकिस्तानच जळफळाट: म्हणे- भारत आता रामनगर बनलाय; तेथे धर्मनिरपेक्षता नाही, हिंदुत्ववादी शक्तींचा बोलबाला

इस्लामाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बहुप्रतीक्षित राम मंदिराचे भूमीपूजन केले जात असताना साऱ्या जगाचे लक्ष भारतावर आहेत. त्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि मोदी सरकारवर जळफळाट व्यक्त केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मंत्री शेख रशीद यांनी मोदींवर टीका करताना त्यांना धर्मांध म्हटले आहे. भारत आता रामनगर झाले आहे. यात धर्मनिरपेक्षता राहिली नाही. अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल राम मंदिराच्या पक्षात लागला, तेव्हा देखील याच पाकिस्तानी मंत्र्याने भारतावर टीका केली होती. त्यावेळी रशीदने भारतात हिंदुत्ववादी ताकदींचा बोलबाला असल्याचे म्हटले होते.

भारत धर्मनिरपेक्ष राहिलेला नाही

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीदने म्हटल्याप्रमाणे, भारत आता रामनगर बनले आहे. देशात धर्मांध शक्ती वाढत असून धर्मनिरपेक्षतेचा ऱ्हास होत आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे झाल्यास भारत आता धर्मनिरपेक्ष राष्ट्र राहिलेला नाही. येथे अल्पसंख्याकांच्या समस्या वाढल्या आहेत. भारत आता श्रीरामांच्या हिंदुत्वात रंगला आहे.

पुन्हा तोच काश्मीरी राग

रशीद पुढे म्हणाले, राम मंदिराचे ज्या दिवशी भूमीपूजन केले जात आहे त्याच दिवशी काश्मीरात कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण होत आहे हा एक संयोग आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवले होते. यानंतर काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला. रशीदच्या मते, पाकिस्तानचे मुस्लिम काश्मीरींसोबत आहेत. काश्मीरींना कुणासोबत जायचे आहे हे ठरवण्याची भारत त्यांना संधी देत नाही.

बातम्या आणखी आहेत...