आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान स्फाेटकांच्या राशीवर:लष्कराचा सर्वात वाईट काळ; इम्रान यांचा लाँग मार्च उद्यापासून पुन्हा इस्लामाबादकडे

पाकिस्तान20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानात एेन थंडीत राजकारण तापू लागले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय घडामाेडींना वेग आला आहे. पाकिस्तानी लष्कराचा सध्या सर्वात वाईट काळ सुरू आहे. कारण स्वत:च्या बचावासाठी पाक लष्कराला पहिल्यांदाच पुढाकार घ्यावा लागला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची राजकीयदृष्ट्या काेंडी झाल्याने त्यांना लष्कराचा आश्रय घ्यावा लागत आहे. वुडराे विल्सन सेंटरचे एशिया प्राेग्रामचे उपसंचालक मायकल कुगेलमॅन म्हणाले, सद्यस्थितीत राजकीयदृष्ट्या पाकिस्तान स्फाेटकांच्या राशीवर अाहे, असे म्हणावे लागेल. कधीही स्फाेट हाेऊ शकताे. त्यातच इम्रान खान यांनी मंगळवारपासून इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च सुरू केला जाईल, असे जाहीर करून टाकले आहे.

४३ लाख काेटी रुपयांच्या कर्जाचा बाेजा
पाकिस्तानवर सुमारे ४३ लाख काेटी रुपयांच्या कर्जाचा डाेंगर आहे. त्यामुळेच पाकिस्तान चीन, साैदी अरेबिया तसेच इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर अवलंबून राहावे लागते. शाहबाज सरकारने कर्जाची मर्यादा वाढवण्यासाठी चीन व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सारख्या संस्थांकडे आर्जव केले आहे. नाणे निधीचा हिरवा कंदील मिळावा यासाठी शाहबाज सरकारने पेट्राेलियम पदार्थांचे दर वाढवले आहेत. म्हणूनच पाकिस्तानात महागाईचा दर सर्वाधिक १६ टक्क्यांवर पाेहाेचला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांमध्ये शाहबाज सरकारच्या विराेधात राेष आहे.

पंजाब महासंचालकांचा राजीनामा
आपल्यावरील हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी पंतप्रधान, मंत्री तसेच मेजर जनरल नसीर यांच्या विराेधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यावर ते अडून आहेत. पंजाबमध्ये इम्रान यांच्या आघाडीचे सरकार आहे. परंतु पंजाबचे मुख्यमंत्री परवेझ इलाही, मेजर जनरल नसीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत.

इम्रानला अपात्र ठरवण्याचा लष्कराचा नवा डाव
इम्रान यांच्या लाेकप्रियतेमुळे घाबरलेल्या लष्कराने इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र घाेषित करण्याचा घाट घातला आहे. तसे डावपेच रचले जात आहेत. तसा प्रस्तावही लष्कराने शाहबाज सरकारला दिला आहे. लष्कर तसेच न्यायपालिकेच्या विराेधात आराेप केल्यावरून अपात्र करण्याची तरतूद असलेल्या राज्यघटनेच्या तरतुदीचा वापर करावे, असे लष्कराने सुचवले

जनरलविराेधात तीव्र निदर्शने
इम्रान यांच्या पीटीआयने पंतप्रधान शाहबाज, मंत्री सनाउल्ला, मेजर जनरल फैजल नसीर यांना हल्ल्याचे आराेपी ठरवले आहे. पीटीआय प्रवक्ते असद उमर म्हणाले, त्यांच्याकडे हल्ल्याची माहिती हाेती. या तिघांनाही पदावरून हटवावे. तसे न केल्यास देशभर तीव्र निदर्शने होतील.

बातम्या आणखी आहेत...